esakal | मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon kabra 1.png

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूने कहर केला आहे. मंगळवारी (ता.१२) दिवसभरात आठ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. तसेच (ता.१३) सकाळी आलेल्या अहवालानुसार १५ कोरोनाबाधित रुग्ण वाढले. यामुळे जिल्ह्याचा आकडा ७१६ झाला आहे. पण दुसरीकडे दिलासादायक गोष्टाही घडत आहेत

मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक/मालेगाव : मंगळवारी (ता.१२) दिवसभरात आठ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.तसेच (ता.१३) सकाळी आलेल्या अहवालानुसार १५ कोरोनाबाधित रुग्ण वाढले. यामुळे जिल्ह्याचा आकडा ७१६ झाला आहे. यामध्ये मालेगावातील 553 कोरोनाचे रुग्ण आहेत. जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा सातशेपार गेलेला असताना, दुसरीकडे मालेगावमधील 154 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. ही बाब जिल्हावासीयांसाठी सर्वाधिक दिलासादायक आहे.

मालेगावकरांना दिलासा 
मालेगावात दाखल असलेल्या कोरोना संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत मालेगावातील 154 रुग्णांना उपचारानंतर कोरोनाची लक्षणे न आढळल्याने डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या दोन महिन्यांत डिस्चार्ज मिळणाऱ्यांची ही सर्वाधिक मोठी संख्या आहे. यामुळे मालेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 227 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात सर्वाधिक मालेगावातील 205 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक शहरातील 12 आणि उर्वरित जिल्ह्यातील दहा रुग्णांचा यात समावेश आहे. सध्या 432 रुग्णांच्या स्वॅबचे रिपोर्ट प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. 

दिवसभरात आठ रुग्ण वाढले; जिल्ह्याचा आकडा सातशेपार ​

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूने कहर केला आहे. मंगळवारी (ता.12) दिवसभरात आठ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्याचा आकडा 701 झाला आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मालेगावात पाच, नाशिकमध्ये एक, निफाडमध्ये एक आणि धुळे येथील महिलेचा समावेश आहे. नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचा सुरक्षारक्षक कोरोनाबाधित आढळून आला आहे. कोरोना रुग्णालयांमधील आरोग्यसेवकांसह नियुक्तीवर असलेल्यांची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये 31 वर्षीय सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह मिळाला आहे. 

हेही वाचा > PHOTOS : थरारक! परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारे तीन ट्रक अन् एक कारचा भीषण अपघात..

* एकूण कोरोनाबाधित : 701 
* मालेगाव : 553 
* नाशिक : 40 
* उर्वरित जिल्हा : 86 
* अन्य जिल्ह्यांतील : 22 
* एकूण मृत्यू : 33 
* कोरोनामुक्त : 227  

हेही वाचा > मैलो न मैल अखंड प्रवास..अन् भररस्त्यात सुरू झाल्या प्रसूती वेदना..मग...