नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 161 बाधित; 104 रूग्ण कोरोनामुक्‍त

अरुण मलाणी
Thursday, 12 November 2020

गुरूवारी आढळलेल्या बाधितांमध्ये नाशिक शहरातील 87, नाशिक ग्रामीणमधील 63, मालेगावचे सात, जिल्हाबाह्य चार कोरोना बाधितांचा समावेश आहे.

नाशिक : जिल्ह्यात सातत्याने कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांपेक्षा नव्याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या अधिक राहात असल्याने अॅक्‍टीव्ह रूग्ण संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. गुरूवारी (ता.12) दिवसभरात 161 बाधित आढळून आले तर 104 रूग्णांनी कोरोनावर मात केली. चार रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातून ऍक्‍टीव्ह रूग्ण संख्येत 53 ने वाढ झाली असून, सद्य स्थितीत जिल्ह्यात 2 हजार 864 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

गुरूवारी आढळलेल्या बाधितांमध्ये नाशिक शहरातील 87, नाशिक ग्रामीणमधील 63, मालेगावचे सात, जिल्हाबाह्य चार कोरोना बाधितांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील 84, नाशिक ग्रामीणचे 13, मालेगावचे चार तर जिल्हबाह्य तीन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील चार मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील दोन तर नाशिक ग्रामीणमधील दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 96 हजार 430 वर पोहोचली असून, यापैकी 91 हजार 847 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 हजार 719 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान दिवसभरात नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात 317, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात 24, मालेगाव महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात 6, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन रूग्ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत 430 अहवाल प्रलंबित होते, यापैकी 206 अहवाल नाशिक ग्रामीण भागातील रूग्णांचे आहेत. 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 162 new corona patient found in nashik district marathi news