नाशिक जिल्ह्यात दिवसभरात १६५ बाधित, तर ३०५ रूग्‍ण कोरोनामुक्‍त 

अरुण मलाणी
Tuesday, 3 November 2020

ऑक्‍टोबर पाठोपाठ नोव्‍हेंबर महिनादेखील जिल्‍हावासीयांसाठी दिलासादायक ठरतो आहे. दिवाळीच्‍या पार्श्वभुमिवर बाजारपेठेत गर्दी होत असतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्‍यकता जाणकारांकडून व्‍यक्‍त केली जाते आहे.

नाशिक : जिल्‍ह्‍यात दिवसभरात आढळणार्या कोरोना बाधितांची संख्या सातत्‍याने घटत असून, मंगळवारी (ता.३) दिवसभरात १६५ बाधित आढळून आले. तर ३०५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून सात रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत १४७ ने घट झाली असून, सद्य स्‍थितीत ३ हजार ४१७ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

नाशिक शहरातील १३९ रुग्ण 

ऑक्‍टोबर पाठोपाठ नोव्‍हेंबर महिनादेखील जिल्‍हावासीयांसाठी दिलासादायक ठरतो आहे. दिवाळीच्‍या पार्श्वभुमिवर बाजारपेठेत गर्दी होत असतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्‍यकता जाणकारांकडून व्‍यक्‍त केली जाते आहे. मंगळवारी (ता.३) दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १३९, नाशिक ग्रामीणचे २२, मालेगाव परीसरातून चार कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १४०, नाशिक ग्रामीणचे १५२, मालेगावचे ८ तर जिल्‍हाबाह्य पाच रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. सात मृतांमध्ये नाशिक शहरातील दोन, नाशिक ग्रामीणचे पाच रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९४ हजार ३१२ झाली असून, यापैकी ८९ हजार २१६ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्‍ह्‍यात १ हजार ६७९ रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

दरम्‍यान दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ४७१, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ३०, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात पाच, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात २, जिल्‍हा रूग्‍णालयात सहा रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ८०४ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ४३९ अहवाल नाशिक ग्रामीणचे असून २९६ संशयित नाशिक शहरातील आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 165 corona patients were found in Nashik district during the day