#Coronafighters :  सलग 18 ते 19 तासांची सेवा करणाऱ्या 'त्यांना' सलाम!

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

धोका लक्षात येताच डॉ. जगदाळे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, फिजिशियन डॉ. प्रमोद गुंजाळ, "मेट्रॉन' सीमा काळे यांची बैठक घेतली. त्या वेळीच त्यांनी स्वाइन फ्लूचा विशेष कक्ष कोरोना विषाणू विलगीकरण कक्षात रूपांतरित करण्याचा निर्णय घेत "सपोर्ट स्टाफ'ची नियुक्तीही केली होती

नाशिक : कोरोना व्यहारस फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जगभर पाय पसरले. तेव्हाच हा धोका नाशिकपर्यंत पोचणार हे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी ओळखले. आदेशाची प्रतीक्षा न करता, त्यांनी पुढच्या दोन दिवसांत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कोरोना विषाणू विलगीकरण कक्ष सुरू केला. तेव्हापासून कक्षाशी संलग्न वैद्यकीय अधिकारी, परिचारिका रोज 18 ते 19 तास सलग सेवा देताहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्परतेचे कौतुक
धोका लक्षात येताच डॉ. जगदाळे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, फिजिशियन डॉ. प्रमोद गुंजाळ, "मेट्रॉन' सीमा काळे यांची बैठक घेतली. त्या वेळीच त्यांनी स्वाइन फ्लूचा विशेष कक्ष कोरोना विषाणू विलगीकरण कक्षात रूपांतरित करण्याचा निर्णय घेत "सपोर्ट स्टाफ'ची नियुक्तीही केली होती. या कक्षात दाखल होणाऱ्या संशयित रुग्णांची नियमित तपासणी, वैद्यकीय सोयी-सुविधा, जिल्ह्यात दाखल होणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती संकलन करणे यांसारख्या जबाबदाऱ्याही संबंधितांवर सोपविण्यात आल्या. त्यानंतर दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयातून कोरोना उपाययोजनेबाबत सूचना प्राप्त झाल्या. मात्र, तत्पूर्वीच या सूचना अमलात आल्याने स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले. 

विविध जबाबदाऱ्यांचा समन्वय 
तीन आठवड्यांपासून विशेष कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांसह शहर-जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती मिळवून ती जिल्हा प्रशासनाकडे देणे. साऱ्यांचे "स्वॅब'चे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवून त्याचे अहवाल प्राप्त करून घेणे. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, महापालिका आरोग्य विभाग यांच्यात समन्वयासह शहर-जिल्ह्यात कोणताही चुकीचा संदेश जाऊन गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता स्वत: डॉ. जगदाळे घेत आहेत. 

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

कोणतीही भीती पसरून गोंधळ होऊ नये, याचीही दक्षता
आतापर्यंत परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यातील सर्व संशयित रुग्णांच्या स्वॅगचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. भविष्यात "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळलाच, तर त्यासाठीही आरोग्य विभाग सज्ज आहे. नागरिकांमध्ये कोणतीही भीती पसरून गोंधळ होऊ नये, याचीही दक्षता घेतली जात आहे. 31 मार्चपर्यंतचा काळ खूप महत्त्वाचा आहे. -डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक  

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 to 19 hours of Daily service for corona suspected in the Civil hospital nashik marathi news