दिलासादायक! कोरोनामुक्‍त रूग्‍णांची संख्या प्रथमच २ हजारच्या उंबरठ्यावर; ॲक्टीव्ह रूग्णसंख्याही घटली

2 thousand corona patients cured in nashik marathi news
2 thousand corona patients cured in nashik marathi news

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्‍णांचे प्रमाण अधिक राहात असल्‍याने, उपचार घेत असलेल्‍या रूग्णांची संख्याही घटली आहे. रविवारी (ता. २०) दिवसभरात १ हजार ४९५ बाधित आढळून आले असले, तरी पहिल्यांदाच एका दिवसात १ हजार ९४० रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, अठरा रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. त्यामुळे ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णांची संख्या ४६३ ने घटून ९ हजार ६२८वर आली आहे. अनेक दिवसांत प्रथमच हा आकडा दहा हजारांच्‍या आत आला आहे. 

एकूण कोरोना बाधितांची संख्या ६४ हजार ००२

रविवारी कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये सर्वाधिक १ हजार २८४ रूग्‍ण नाशिक शहरातील, तर नाशिक ग्रामीणचे ६२०, मालेगावचे २२ आणि जिल्‍हाबाह्य चौदा रूग्ण आहेत. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १ हजार ०४५, ग्रामीणचे ३९३, मालेगावचे ४०, जिल्‍हाबाह्य १७ रूग्‍णांचा समावेश आहे. अठरा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि मालेगाव महापालिका हद्दीतील प्रत्‍येकी सहा रूग्‍ण आहेत. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ६४ हजार ००२ झाली आहे. यापैकी ५३ हजार २०१ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार १७३ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सद्यस्‍थितीत ९ हजार ६२८ रूग्‍णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ३८१ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ८४२ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. 

दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ९४३ संशयित, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात शंभर रूग्‍ण, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ३५, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात १९, जिल्‍हा रूग्‍णालयात सात संशयित दाखल झाले होते. 
 
ग्रामीणमधील आणखी एका पोलिसाचा बळी 

गेल्‍या आठवड्याभरात शहर पोलिस दलात दोन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे. त्‍यातच रविवारी नाशिक ग्रामीण पोलिस दलात आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस हवालदार बाळू दशरथ शिंदे (वय ५५) यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

मालेगावला सात जणांचा मृत्यू 

मालेगाव : शहरात दोन कोरोनाबाधित आणि पाच संशयित अशा एकूण सात जणांचा रविवारी (ता. २०) येथील सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. शहरातील कोरोनाबळींची संख्या १४१ तर तालुक्यातील ४४ झाली आहे.

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com