जिल्ह्यातील एकमेव खरेदी केंद्रातून 'इतक्या' क्विंटल कापसाची खरेदी; शेतकऱ्यांना दिलासा

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळावा म्हणून मालेगाव येथे सुरु करण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकमेव खरेदी केंद्रात जिल्ह्यातील एक हजार ९२९ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली. 

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग फैलावाच्या काळातही पांढऱ्या सोन्याची विक्री सुरु होती. शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळावा म्हणून मालेगाव येथे सुरु करण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकमेव खरेदी केंद्रात जिल्ह्यातील एक हजार ९२९ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली. 

हमी भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा

श्री. बलसाने म्हणाले, खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांच्या कापसला हमी भाव देण्यासाठी सरकारने मालेगावमधील युनायटेड कॉटन एक्सट्रॅाट लिमिटेड (चाळीसगांव फाटा) येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली. खरेदी केंद्राचा लाभ मालेगांव, नांदगाव आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला. कोरोना प्रादुर्भावाअगोदर १ हजार २२१ शेतकऱ्यांकडून ३९ हजार ६३० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. पुढे ७०८ शेतकऱ्यांकडून २६ हजार ८३७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कापसाला प्रतवारीनुसार हमी भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा >  संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

कापसाच्या गाठी करणार
 
कापूस खरेदीसाठी एकूण १ हजार ३६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. १३९ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे अजून शिल्लक आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसावर कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून प्रक्रिया करुन त्याच्या गाठी तयार केले जात असल्याचेही श्री. बलसाने यांनी सांगितले. ते म्हणाले, की खरेदी केंद्रात कापसाची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे मालेगांव, नांदगाव आणि येवला तालुक्यातील शिल्लक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणावा. 

हेही वाचा > पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला... केले  आत्महत्येस प्रवृत्त

(संपादन - किशोरी वाघ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2,000 farmers from Malegaon shopping center 66 thousand 467 quintals of cotton was purchased nashik marathi news