esakal | पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला...केले आत्महत्येस प्रवृत्त
sakal

बोलून बातमी शोधा

depressed girl.jpg

मुलीचे वडील शशिकांत जगताप यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी मयूरी  बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. त्यांचा मावसभाऊ म्हणजेच मयुरीचा काका संजय जावळे मयूरीला टोमणे मारायचा. आणि मग त्यानंतर...

पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला...केले आत्महत्येस प्रवृत्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : मुलीचे वडील शशिकांत जगताप यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी मयूरी  बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. त्यांचा मावसभाऊ म्हणजेच मयुरीचा काका संजय जावळे मयूरीला टोमणे मारायचा. आणि मग त्यानंतर...

असा घडला प्रकार

मुलीचे वडील शशिकांत जगताप (५८, महालक्ष्मीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी मयूरी (वय २०) बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. त्यांचा मावसभाऊ संजय जावळे मयूरीला टोमणे मारायचा. तिचे फोटो मोठ्या वहिनीच्या मोबाईलवर पाठवले. फोटोतील मुलाविषयी जाब विचारला. मयूरीने तो मानलेला भाऊ असून असे फोटो काढले ही चूक झाल्याचे सांगितले. तुझ्या पप्पाला काही माहीत नाही, मला सर्व माहीत आहे, असे सांगून मयुरीला दमबाजी केली. निराश मयूरीने गळफास घेतला. बेडच्या बाजूला चिठ्ठी पडलेली होती. त्यात मयूरीने संजूकाकाचे वागण्या-बोलण्याबाबत तसेच निखिल बोराडे याने दम दिल्याचे लिहिले होते. 

 हेही वाचा > कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा

पोलिसांत मावसकाकाविरुध्द गुन्हा दाखल

मावसकाकाने पुतणीचे मित्रासोबतच्या फोटोवरून चारित्र्यावर संशय घेत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांत मावसकाकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 हेही वाचा > VIDEO : बघ्यांची भरलेली जत्रा बघताच बिबट्या बिथरतो तेव्हा....काय घडले?

go to top