esakal | संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 
sakal

बोलून बातमी शोधा

married woman 123.jpg

धनश्री आईसह मुलाला भेटण्यासाठी तसेच वाद सोडवण्यासाठी बोरगड येथे आल्या होत्या. या वेळी पतीसह सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : धनश्री कौटुंबिक वादानंतर आईसह मुलाला भेटण्यासाठी तसेच वाद सोडवण्यासाठी बोरगड येथे सासरी आल्या होत्या. या वेळी पतीसह सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

असा घडला प्रकार

कौटुंबिक वादातून माहेरी गेलेली विवाहिता मुलाला भेटण्यास सासरी आली असता तिला तसेच तिच्या नातेवाइकांना सासरच्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार म्हसरूळजवळील बोरगड परिसरात घडला. 
जयप्रकाश थोरात (रा. बोरगड, म्हसरूळ), सुनंदा बोरसे, अभय बोरसे, विद्या जगताप (सर्व रा. बोरगड) अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. धनश्री थोरात (रा. कल्याण, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. धनश्री कौटुंबिक वादानंतर आईसह मुलाला भेटण्यासाठी तसेच वाद सोडवण्यासाठी बोरगड येथे सासरी आल्या होत्या. या वेळी पतीसह सासरच्या मंडळींनी त्यांना व त्यांच्या आईस बेदम मारहाण केली. म्हसरूळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 

 हेही वाचा > कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा

दुसरी घटना - चारित्र्याचा संशय घेऊन तिचा मानसिक छळ
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला. संजय जावळे (रा. रेल्वे ट्रॅक्शन कॉलनी, एकलहरे रोड, नाशिक रोड) असे संशयित पतीचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील शशिकांत जगताप (रा. दसक, नाशिक रोड) यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्या मुलीचा दुसऱ्या एका मुलासोबत असलेला फोटो पाहून संशयित जावळे याने तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन सातत्याने तिला बोलून तिचा मानसिक छळ केला. यास कंटाळून तिने १७ जुलैला राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. उपनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > VIDEO : बघ्यांची भरलेली जत्रा बघताच बिबट्या बिथरतो तेव्हा....काय घडले?

go to top