जिल्ह्यात २ हजार ८०१ रूग्‍णांवर उपचार सुरु; दिवसभरात २४० कोरोनामुक्त

अरुण मलाणी
Monday, 9 November 2020

सोमवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक १३५, तर नाशिक ग्रामीणचे ९१, मालेगावचे तीन तर जिल्‍हाबाह्य नऊ कोरोना बाधित आढळले.

नाशिक : जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांचे प्रमाण नाशिक शहरी भागात अधिक असल्‍याचे गेल्‍या काही दिवसांच्‍या आकडेवारीतून स्‍पष्ट होते. सोमवारी (ता.९) दिवसभरात २४० कोरोना बाधित आढळले. तर २४० रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून सहा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत सहाने घट झाली असून, सद्य स्‍थितीत २ हजार ८०१ बाधितांवर जिल्‍ह्‍यात उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील सर्वाधिक १३५ बाधित

सोमवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक १३५, तर नाशिक ग्रामीणचे ९१, मालेगावचे तीन तर जिल्‍हाबाह्य नऊ कोरोना बाधित आढळले. कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील २०५, नाशिक ग्रामीणचे ११, मालेगावचे २२ तर जिल्‍हाबाह्य दोन रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. सहा मृतांमध्ये दोन नाशिक ग्रामीणचे रूग्‍ण असून, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन, नाशिक महापालिका हद्दीतील एक तर जिल्‍हाबाह्य एका रूग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. जिल्‍ह्‍यात आतापर्यंत ९५ हजार ७४४ बाधित आढळले असून, यापैकी ९१ हजार २३६ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ७०७ रूग्‍णांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५४६, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८१, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात चार तर जिल्‍हा रूग्‍णालयात तीन रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ५६७ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी २६९ नाशिक ग्रामीण तर २२७ नाशिक शहरातील रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 240 corona patients were found during the day nashik marathi news