बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगांची झडती घेताच पोलीसांनाही धक्का; जॉगिंगला गेलेल्या नागरिकांच्या बाब लक्षात

मुकुंद भडांगे
Tuesday, 26 January 2021

मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारात सर्व्हिस रोडलगत दोन बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगा पडलेल्या होत्या. सकाळी जॉगिंगसाठी गेलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. 

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारात सर्व्हिस रोडलगत दोन बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगा पडलेल्या होत्या. सकाळी जॉगिंगसाठी गेलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. 

दोन बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगांची झडती घेताच पोलीसांनाही धक्का

पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारात सर्व्हिस रोडलगत दोन बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगा पडलेल्या होत्या. सकाळी जॉगिंगसाठी गेलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. याबाबत पिंपळगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी येऊन बॅगा उघडून बघितल्या असता बॅगेत १३ किलो १०० ग्रॅम गांजा आढळला. या गांजाची किंमत तीन लाख दहा हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

\हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

कोकणगाव शिवारात ३० किलो गांजा जप्त 

मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव परिसरात सुमारे तीन लाख १२ हजारांचा गांजा असलेल्या दोन बेवारस बॅगा आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलिसांच्या पथकाने बॅगा ताब्यात घेतल्या. गांजाचे मोजमाप केले असता १३ किलो १०० ग्रॅम वजन भरल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

पिंपळगाव पोलिसांची कारवाई 

या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल जाधव, एकनाथ पवार, दीपक निकुंभ तपास करीत आहेत. या वेळी कोकणगावचे पोलिसपाटील तुकाराम पवार, ग्रामविकास अधिकारी अभिजित तुपे उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 kg ganja seized in Konkangaon Shivar nashik marathi news