धक्कादायक! मालेगावात राज्य राखीव दलातील चक्क 'इतक्या' पोलिसांना कोरोनाची लागण?

police-and-corona.jpg
police-and-corona.jpg

नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूने मालेगावात कहर केला आहे. अवघ्या महिन्याभरात मालेगावात कोरोनाचे अडीशे रुग्ण झाले असून यामध्ये इतके पोलिस कर्मचारी आहेत. तर, एवढे पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जे रस्त्यावर धोका पत्करून उतरले, त्याच पोलिसांना कोरोनाने विळख्यात घेतल्याने पोलिस दलासाठी चिंतेची बाब आहे.  

इतके पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज 

नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 276 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मालेगाव शहरात 253 आहेत. मालेगावातील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांतील अर्धा फौजफाटा शहरात दाखल झाला होता. त्यांच्या मदतीला नंतर राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ) दाखल झाल्या होत्या. मालेगाव शहराच्या सीमांवर नाकाबंदी करण्यात आल्या. मालेगाव येथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलिसांचीही संख्या वाढविण्यात आली. आत्तापर्यंत 37 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 23 पोलिस हे राज्य राखीव पोलिस दलातील तर, 14 पोलिस हे नाशिक ग्रामीण दलातील आहेत. दरम्यान, बाधित पोलिसांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. आजमितीस मालेगावात 1 हजार 800 पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. तर, त्यांच्या मदतीला धुळे, जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्याही तुकड्या आणि परजिल्ह्यातील पोलिसही आलेले आहे. तसेच, स्वत: नाशिकच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह याही शहरात तळ ठोकून आहेत. 

आठवड्यात पोलिसांना विळखा 

दोन आठवड्यांपूर्वी राज्य राखीव पोलिस दलातील हिंगोलीचे पाच जवान औरंगाबाद येथील आरोग्य तपासणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले होते. त्यानंतर, गेल्या आठवड्यात नाशिक ग्रामीणचा पहिला पोलिस कर्मचारी व त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सातत्याने यात वाढ होत जाऊन, बुधवारी (ता. 29) मध्यरात्रीपर्यंत आलेल्या रिपोर्टपर्यंत मालेगावात कर्तव्यावर असलेल्या 37 पोलिस कोरोनाबाधित झालेले आहेत. यामध्ये सर्वाधिक 23 पोलिस हे राज्य राखीव पोलिस दलाचे तर 14 नाशिक ग्रामीण पोलिस कर्मचारी आहेत. मालेगाव शहर पोलिस ठाणे, आयेशानगर, आझादनगर आणि अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातील हे पोलिस कर्मचारी आहेत. बुधवारी (ता. 29) मोठ्याप्रमाणात पोलिस पॉझिटिव्ह आल्याने धाबे दणाणलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संपर्कात आलेल्या 156 पोलिसांना क्वारंटाईन केले आहे. मात्र ग्रामीण पोलिसांसाठी ही बाब चिंतेची आहे. 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. बंदोबस्तातील पोलिसांची आरोग्य तपासणी केली जात आहे. लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन केले जात आहे. तर बाधितांना नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com