ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 30 April 2020

एक तर लॉकडाऊन त्यातही कडकडीत ऊन असताना डोक्यावर कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसताना पायी चालत असलेल्या या मजुरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रात्रभर रस्त्यावरच मुक्काम करायचा आणि दिवसा परत गावची वाट धरायची असा हा दिनक्रम किती दिवस चालणार आहे

नाशिक / कोकणगाव : एक तर लॉकडाऊन त्यातही कडकडीत ऊन असताना डोक्यावर कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसताना पायी चालत असलेल्या या मजुरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रात्रभर रस्त्यावरच मुक्काम करायचा आणि दिवसा परत गावची वाट धरायची असा हा दिनक्रम किती दिवस चालणार आहे. महाराष्ट्रसह देशभरात लॉकडाऊन असताना दररोज दीड ते दोन हजार परप्रांतीय कामगार कोकणगाव मुंबई आग्रा हायवेवरून पायी जात आहेत. मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, ठाणे ,पनवेल, पुणे आदी भागात काम करणारे हे कामगार उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेशच्या दिशेने पायी चालत आहेत.

आणखी चौदाशे ते पंधराशे किलोमीटरचे अंतर
मुंबई ते बिहार पुणे ते उत्तर प्रदेश असा एकूण प्रवास पाहिला तर जवळपास दीड ते दोन हजार किलोमीटरचा अंतर आहे हे अंतर पण कापत असताना आता हे मजूर कोकणगावपर्यंत पोहोचलेले आहेत. इथून पुढे अजून त्यांना चौदाशे ते पंधराशे किलोमीटरचे अंतर कापायचे आहे दररोज पायी चालण्याचे अंतर 50 ते 60 किलोमीटर आहे कडक उंन असल्यामुळे तसेच रस्त्याला कोणतेही हॉटेल उघडे नाही. धाबे बंद आहे. खाण्याचे खूप हाल होत आहेत पिण्याचे पाणी शोधण्यासाठी शेतावर जावे लागत आहे. वाटेतच कुठे शेतात पाणी चालू असताना अंघोळ केली जाते. असा हा संघर्ष प्रवास सध्या लोकांमुळे परप्रांतीय कामगार करत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दूरवरून आलेल्या काही कामगारांशी बोलून विचारपूस केली असता आम्हाला आमच्या घरापर्यंत पोहोचवा अशी प्रत्येकाला विनवणी हे मजूर करत आहेत कोरोना सारखा महामारी असलेला आजार मात्र माणसाला माणसापासून दूर के चंदा इच्छा असतानाही गाडीवाले गाडी घेऊ शकत नाही अशी परिस्थिती पहिल्यांदा या मजुरांवर ती आली आहे दिवसाकाठी दीड ते दोन हजार मजूर कोकणगाव मार्गे बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यात जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

एवढे लांब अंतर कापूनही घरचेही घरात घेतील की नाही?
लॉकडाऊनमुळे गाडया नाहीत हाताला काम नाही इतके कुटुंब कसे पोसायचे म्हणून पायी का होईन हक्काच्या घराची ओढ लागली आहे एवढे लांब अंतर कापूनही घरचेही घरात घेतील की नाही कोण जाणे रस्त्याने पोट भरते पहाटपासून पायपिट सुरू होते - महादेव कानडे अलाहाबाद (उ.प्र)

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured legs crossed the boundary of the lockdown nashik marathi news