नाशिक जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा दुपटीहून अधिक कोरोनामुक्त; दिवसभरात १४ रूग्‍णांचा मृत्यू

अरुण मलाणी
Friday, 16 October 2020

ऑक्‍टोबर महिन्‍यात तिसऱ्यांदा नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची दिवसभरातील संख्या पाचशेच्‍या आत राहिली. शुक्रवारी नाशिक शहरात २८४, नाशिक ग्रामीणला १८६, मालेगाव पाच तर जिल्‍हाबाह्य सात कोरोना बाधित आढळले.

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी बरे होणाऱ्या रूग्‍णांच्‍या प्रमाणात अधिक असल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत किरकोळ वाढ होत होती. त्‍यातच शुक्रवारी (ता.१६) नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांपेक्षा दुपटीहून अधिक कोरोनामुक्‍तांची संख्या राहीली. दिवसभरात ४८२ कोरोना बाधित आढळले असतांना, १ हजार ०८० रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून चौदा रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ६१२ ने घट झाली आहे. 

ऑक्‍टोबर महिन्‍यात तिसऱ्यांदा नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची दिवसभरातील संख्या पाचशेच्‍या आत राहिली. शुक्रवारी नाशिक शहरात २८४, नाशिक ग्रामीणला १८६, मालेगाव पाच तर जिल्‍हाबाह्य सात कोरोना बाधित आढळले. तर कोरोनामुक्‍तांमध्ये नाशिक शहरातील ५६१, नाशिक ग्रामीणचे ४९८, मालेगावचे १४ तर जिल्‍हाबाह्य सात रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. चौदा मृतांमध्ये पाच नाशिक शहरातील, आठ नाशिक ग्रामीणचे, एक मालेगाव महापालिका हद्दीतील रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. यातून एकूण कोरोना बाधितांची संख्या ८८ हजार ३७० झाली असून, यापैकी ७९ हजार ७२२ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ५७८ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. तर सद्य स्‍थितीत ७ हजार ०७० बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा >"कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका हद्द व गृहविलगीकरणात ९२३, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ६८, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात आणि जिल्‍हा रूग्‍णालयात प्रत्‍येकी तेरा संशयित दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 482 new corona patients found in nashik marathi news