गोरगरीबांच्या राशनवर डल्ला मारणे भोवले; निफाड तालुक्यात ४९ दुकानांचे परवाने रद्द 

rasaion
rasaion

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : गोरगरिबांच्या हक्काच्या रेशनवर डल्ला मारत भ्रष्टाचार करणाऱ्या निफाड तालुक्यातील रेशन दुकानदार प्रशासनाच्या रडारवर होते. अखेर महिनाभरापूर्वी तहसील कार्यालयाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. या वेळी तालुक्यातील काही रेशन दुकानदारांनी दुकान चालविण्यास अमर्थता दर्शवली होती. 

कामकाजात अनियमितता, परवाना नूतनीकरण न करणे, भ्रष्टाचार यामुळे निफाड तालुक्यातील १५४ पैकी ४९ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर काही रेशन दुकानादारांनी स्वत:हून परवाने जमा केले. परवाना रद्द झालेल्या गावांमध्ये लवकरच नवीन परवान्यासाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे.


या गावांचा समावेश 

खानगाव नजीक, सारोळे खुर्द, डोंगरगाव, भरवस, पाचोरे, कानळद, काथरगाव, सुंदरपूर, कुरडगांव, भाऊसाहेबनगर, भुसे, करंजी खुर्द, नारायणगाव, दारणासांगवी, थेरगाव, ओणे, चाटोरी, सावळी, चेहेडी, लालपाडी, नागापूर, रेडगाव, कुंभारी, गोरठाण, साकोरे, नारायण टेंभी, पंचकेश्‍वर, कारसूळ, देवपूर, रौळस, दिंडोरी, कुंदेवाडी, ओझर, शिरसगाव, अंतरवेली आदी. 

निफाड तालुक्यातील ४९ रेशन दुकानांचे परवाने रद्द झाले आहेत. ते तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच ती कार्यान्वित होऊन गोरगरिबांना धान्य मिळू शकेल. 
-आमदार दिलीप बनकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com