दिवाळीच्या तोंडावर नियतीचा घाला! भल्या पहाटेच्या घटनेने कुटुंबियांचा थरकाप; परिसरात हळहळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

नेहमीप्रमाणे पहाटे ते मॉर्निंग वॉकला गेले. नेहमीपेक्षा जास्त वेळ होऊनही ते घरी न परतल्याने घरचे काळजीतच पडले. अन् अखेर काही वेळ उलटताच आली बातमी. अचानक घडलेल्या प्रकाराचा कुटुंबियांना धक्काच...वाचा काय घडले?

नाशिक : (नांदूर शिंगोटे) नेहमीप्रमाणे पहाटे ते मॉर्निंग वॉकला गेले. नेहमीपेक्षा जास्त वेळ होऊनही ते घरी न परतल्याने घरचे काळजीतच पडले. अन् अखेर काही वेळ उलटताच आली बातमी. अचानक घडलेल्या प्रकाराचा कुटुंबियांना धक्काच...वाचा काय घडले?

अशी आहे घटना

घरी दिवाळीची तयारी सुरु...अन् अचानक आली दुखद बातमी. घटनेने कुटुंबियांच्या काळजाचा ठोकाच चुकला. गुरुवार (ता. 12) शिवाजी पुंजाजी लोहकरे (वय 55) पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. नांदुरशिंगोटे गावाकडून सिन्नर बाजूकडे नाशिक-पुणे बायपासच्या दिशेने जात असताना थोडं दूरवर गेल्यानंतर अचानक मागून दुचाकीचा आवाज आला. अन् काही कळायच्या आतच अज्ञात दुचाकीने धडक दिली. गंभीर मार लागल्याने त्यातच लोहकरे यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नांदुर-शिंगोटे येथील शाखेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

हेही वाचा >  मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

अखेरची मॉर्निंग वॉक ठरली

ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परिवारावर लोहकरे यांचा अचानक जाण्याने दुख:चा डोंगरच कोसळला. 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 55-year-old man dies in two-wheeler collision nashik marathi news