esakal | चिंता मिटली! नाशिक शहराला ५,५०० एमसीएफटी पाणी; गरजेनुसार होणार पाणीपुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan b.jpg

महापालिकेचे लवकरच ऑक्सिजन प्लॅट तयार होणार असून, त्यातून दोन हजार सिलिंडर मिळतील. उद्योगांना ऑक्सिजन द्यायला सुरवात केली आहे. मास्क न वापरणारे पोलिसांच्या रडारवर असून, मास्क नसेल तर व्यवहार करू नये, असे आवाहन केले. 

चिंता मिटली! नाशिक शहराला ५,५०० एमसीएफटी पाणी; गरजेनुसार होणार पाणीपुरवठा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : यंदा चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात पिण्यासह शेती, उद्योगांचा प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे वाढीव मागणीनुसार नाशिक शहर ५,५०० एमसीएफटी, तर मालेगावला १,४०० एमसीएफटी पाण्याच्या नियोजनामुळे यंदा पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार नाही, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

शेती, उद्योगाला गरजेनुसार पाणीपुरवठा 

नाशिकला नियोजन भवनात झालेल्या पाणी नियोजन आणि कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद मुख्याधिकारी लीना बनसोड उपस्थित होते. ते म्हणाले, की यंदा सगळी धरणं भरली असून, जायकवाडीला पाणी सोडावे लागणार नाही. तसेच, पिण्याच्या पाण्यासह उद्योग आणि शेतीला पाणी देण्याची अडचण येणार नाही. त्यामुळे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या वाढीव मागणीनुसार पाण्याचे नियोजन झाले आहे. 
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. 

मास्क नसेल तर व्यवहार करू नये, असे आवाहन

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्केच्या पुढे आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिर आठ हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत. दर व बोर्ड लावला जात आहे. रेमडेसिव्हिरचा काळा बाजाराच्या तक्रारी आल्यास त्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठीचा मसुदा तयार केला जात आहे. ऑक्सिजन ५० टन उपलब्ध होत आहे. हॉस्पिटलांची दैनंदिन तपासणी होते आहे. महापालिकेचे लवकरच ऑक्सिजन प्लॅट तयार होणार असून, त्यातून दोन हजार सिलिंडर मिळतील. उद्योगांना ऑक्सिजन द्यायला सुरवात केली आहे. मास्क न वापरणारे पोलिसांच्या रडारवर असून, मास्क नसेल तर व्यवहार करू नये, असे आवाहन केले. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

- मनपा ऑक्सिजन प्लॅट २० कि.वॅट 
- नवरात्रोत्सवात रास-गरबा गर्दी नाही 
- विनामास्क फिरणारे यापुढे रडारवर 
- मास्क नसेल तर व्यवहार करू नये 
- विवाहात बॅन्ड वापरा, पण गर्दी ५० 

दुकानांच्या वेळा 

दुकान - सकाळी सात ते रात्री आठ 
हॉटेल - सकाळी आठ ते रात्री नऊ 
बार - सकाळी ११ ते रात्री नऊ 

पाण्याची स्थिती 

नाशिक महापालिका - ५,५०० एमसीएफटी 
मालेगाव महापालिका - १,४०० एमसीएफटी 

कोरोना स्थिती 

- ९ सप्टेंबर २०२० - ९,५२१ ॲक्टिव्ह 
- ९ ऑक्टोबर - ८,७०७ ॲक्टिव्ह 
- रुग्ण घटले - ७६१ ने कमी 
- मृत्युदर राज्य - २.७० टक्के 
- मृत्युदर नाशिक - १.७० टक्के 
- रिकव्हरी दर - ८० टक्के  

हेही वाचा >  हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO