नाशिकच्या 'या' दोन गावांतील 754 शेतकरी झाले कर्जमुक्त!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

महाविकास आघाडी सरकारने घोषीत केल्याप्रमाणे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर व्हायला सुरुवात झाली. सोमवारी (ता.24) जिल्ह्यातील प्रायोगिक स्वरुपात निवडलेल्या दोन गावातील 754 शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर झाली. 

नाशिक : महाविकास आघाडी सरकारने घोषीत केल्याप्रमाणे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर व्हायला सुरुवात झाली. सोमवारी (ता.24) जिल्ह्यातील प्रायोगिक स्वरुपात निवडलेल्या दोन गावातील 754 शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर झाली. 

राज्यातील 34 जिल्ह्यातील 68 गावांची प्रायोगिक स्वरुपात निवड

महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती योजनेसाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील 68 गावांची प्रायोगिक स्वरुपात निवड केली होती. त्यात, नाशिक जिल्ह्यातील दोन गावांचा प्रायोगिक स्वरुपात निवड झाली होती. त्यात,चांदोरी (ता.निफाड), सोनांबे (ता.सिन्नर) अशा दोन गावांचा समावेश आहे. आज सकाळी दोन्ही गावातील नाव पोर्टलवर जाहीर झाली. त्यानंतर सहकार विभागाचे उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्टलवरील याद्या डाउनलोड करुन त्या त्या गावातील ग्रामपंचायती च्या फलकावर लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या. 

उत्साह आणि गर्दी 

चांदोरी (ता.निफाड) व सोनांबे येथे कर्जमुक्त शेतकऱ्यांची प्रायोगिक स्वरुपातील पहिली यादी पहाण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना 
कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बॅक खाते आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यांची खात्री करुन घेण्यात आली. सहकार विभागाने 
विशेष टेबल लावून ही प्रक्रिया राबविली त्यात, पुरावे तपासण्याची औपचारीकता पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना श्री बलसाने यांच्या हस्ते देण्यात आले. कर्जमुक्तीचा पुरावा हाती पडल्यानंतर शेतकऱ्यांनी योजनेचे स्वागत केले. 

हेही वाचा > रंगाचा झाला भंग!...जेव्हा वाटेत दिसला 'तो'...अन् मग 

मी सोसायटीकडून 59 हजार रुपये कर्ज घेतले होते. राज्य शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माझे कर्ज माफ झाले आहे. आजच्या यादीत माझे नाव 
लागले असून कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र मला मिळाले. शासनाची योजना अखेरच्या माणसांपर्यत अशाच पोहोचाव्यात ही या निमित्ताने अपेक्षा आहे. - साहेबराव गडाख (चांदोरी ता.निफाड) 

हेही वाचा > डायलिसिस सेंटर प्रकरणी लपवाछपवी!...शेकडो रुग्णांच्या भोवती मृत्यूचा फास

प्रायोगिक स्वरुपातील गावांत याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती. दोन्ही गावात असाच प्रतिसाद आहे. ही यादी प्रायोगिक स्वरुपात निवडलेल्या गावांची असून लवकरच पात्र शेतकऱ्यांची याद्या टप्प्यटप्प्याने जाहीर होणार आहे. सुरळितपणे प्रक्रिया सुरु आहे. - गौतम बलसाने (सहकार उपनिबंधक, नाशिक 

हेही वाचा > जर्मनीसह युरोपमध्ये द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा डंका!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 754 farmers from 2 villages of Nashik became debt free nashik marathi news