रंगाचा झाला भंग!...जेव्हा वाटेत दिसला 'तो'...अन् मग

गिर्यारोहक.jpg
गिर्यारोहक.jpg

नाशिक : (म्हसरूळ) येथील चामरलेणेवर सकाळी गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोन गिर्यारोहक टोकावर चढत असतांना अडकले, त्यांची सुखरूप सुटका करण्यात म्हसरूळ पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.

असा आहे प्रकार

रविवार म्हटले की, गिर्यारोहक चामारलेणे येथे गिर्यारोहणासाठी येत असतात. रविवार (ता.23) रोजी सकाळी नऊ वाजता पेठरोडवरील दत्तनगर येथील पंचवीस वर्षीय दिपक व सोळा वर्षीय ऋषिकेश कोठूळे हे गिर्यारोहणासाठी चामरलेणेंच्या टोकावर वर जात असतांना वाटेत मुरूम व दगड लागले व त्या ठिकाणी अचानक सर्प दिसल्याने हे दोघेही घाबरले व अडकून पडले. त्यावेळी दीपक याने अग्निशामक दलाच्या दूरध्वनी क्रमांका वर संपर्क साधून अडकल्याची माहिती दिली. पुढील पंधरा ते वीस मिनिटात म्हसरूळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरें व पोलीस शिपाई नितीन पारधी, सोपान पवार तसेच अग्निशामक दलाचे नितीन म्हस्के, धीरज पाटील, मंगेश पिंपळे पोहचले आणि जवळपास एक ते दीड तासात अडकून पडलेले गिर्यारोहक दिपक व ऋषिकेश यांची सुखरूप सुटका करत चामारलेण्याच्या पायथ्याशी घेऊन आले व त्या दोनही गिर्यारोहकांच्या वडिलांच्या ताब्यात दिले.

गिर्यारोहकांनी गिर्यारोहण करताना आपण जेवढे ध्येय गाठू शकतो तो पर्यंत जावे अन्यथा त्याठीकानाहून माघारी यावे आणि जीव घेणे प्रयत्न टाळावेत. - पंढरीनाथ ढोकणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हसरूळ पोलिस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com