Corona Update : ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत सलग दुसऱ्या दिवशीही घट; नवे ८७२ बाधित आढळले

अरुण मलाणी
Tuesday, 6 October 2020

मंगळवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५८९, नाशिक ग्रामीणचे २३४, मालेगावचे २८ तर, जिल्‍हाबाह्य २१ रूग्‍णांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील ३३५, नाशिक ग्रामीणचे ६०२ आणि मालेगावचे ४६ रूग्ण आहेत.

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या अधिक राहिली. तसेच, नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या सलग चौथ्या दिवशी एक हजारपेक्षा कमी राहिली. मंगळवारी (ता. ६) दिवसभरात नव्‍याने ८७२ बाधित आढळून आले. ९८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली, तर बारा जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. 

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८१ हजार ८९५

मंगळवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५८९, नाशिक ग्रामीणचे २३४, मालेगावचे २८ तर, जिल्‍हाबाह्य २१ रूग्‍णांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील ३३५, नाशिक ग्रामीणचे ६०२ आणि मालेगावचे ४६ रूग्ण आहेत. दिवसभरातील बारा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील सात, नाशिक ग्रामीणच्या पाच रूग्‍णांची नोंद आहे. यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८१ हजार ८९५ झाला आहे. यापैकी ७१ हजार २५५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, १ हजार ४६३ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. सद्यस्‍थितीत ९ हजार १७७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात दाखल झालेल्‍या संशयितांची संख्या मात्र लक्षणीय राहिली. नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ४८०, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १६५, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १३, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात १५ संशयित दाखल झाले. जिल्‍हा रूग्‍णालयात आज एकही संशयित दाखल झाला नाही. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ८८९ अहवाल प्रलंबित होते. यापैकी १ हजार २०३ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. 
 
नाशिकचे ५० हजार जण कोरोनामुक्त 

जिल्ह्यातील सर्वाधिक रूग्‍ण नाशिक महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. आतापर्यंत ५५ हजार ०७७ कोरोना बाधित आढळून आले आहेत. यापैकी ५० हजार ००९ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. ७८३ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, शहरातील ४ हजार २८५ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

मालेगावला पुन्हा ३२ पॉझिटिव्ह 

मालेगाव : शहर व तालुक्यात मंगळवारी नव्याने ३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यातील २८ रुग्ण शहरातील, तर ४ ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान, महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असलेल्या उमराणे येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३७ टक्के झाले आहे. शहरातील ३३४ अहवाल प्रलंबित आहेत. महापालिका रुग्णालयात आज नव्याने १३ रुग्ण दाखल झाले. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 872 new corona patients found in nashik marathi news