#MondayMotivation : शेतकऱ्यांच्या मुली सर्वांवर भारी!...त्यांच्या कामगिरीचे सगळ्यांना कौतुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

सध्या मुलींचा शिक्षणाचा कल वैद्यकीय, अभियांत्रिकी विभागाकडे अधिक असल्याचे दिसते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने कृषी सेवा "ब' गटांतर्गत 83 उमेदवारांची शिफारस राज्याच्या कृषी विभागाला केली आहे. यापैकी एकतृतीयांश महिलांची कृषी अधिकारी म्हणून नेमणूक होणार असल्याने कृषी विभागातही मुलींनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कृषी विभागात सध्या महिलांची संख्या अत्यल्प आहे. नव्याने निवड झालेल्या महिला अधिकाऱ्यांमुळे कृषी विभागात महिलांचा दबदबा तयार होणार आहे.

नाशिक : (वडनेरभैरव) महिलांसाठी आव्हानात्मक असलेल्या कृषी विभागात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कृषी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून, यात शेतकऱ्यांच्या मुलींची संख्या 90 टक्के आहे. यात नाशिक जिल्ह्यातील धोंडगव्हाण (ता. चांदवड) येथील आरती बोरस्ते हिचाही समावेश आहे. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची नव्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षा 

सध्या मुलींचा शिक्षणाचा कल वैद्यकीय, अभियांत्रिकी विभागाकडे अधिक असल्याचे दिसते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने कृषी सेवा "ब' गटांतर्गत 83 उमेदवारांची शिफारस राज्याच्या कृषी विभागाला केली आहे. यापैकी एकतृतीयांश महिलांची कृषी अधिकारी म्हणून नेमणूक होणार असल्याने कृषी विभागातही मुलींनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कृषी विभागात सध्या महिलांची संख्या अत्यल्प आहे. नव्याने निवड झालेल्या महिला अधिकाऱ्यांमुळे कृषी विभागात महिलांचा दबदबा तयार होणार आहे. निवडप्राप्त महिलांना एक महिन्यात रुजू व्हावे लागणार आहे. निवड झालेल्या 90 टक्के महिला अधिकारी शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतीविषयक प्रश्‍नांची चांगली जाण आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची नव्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे. 

हेही वाचा > अटल आरोग्य वाहिनी योजनेमुळे कळवणमधील 'या' विद्यार्थिनीचा पुनर्जन्म!

निवड झालेल्या महिला व निवडस्थान 

आरती बोरस्ते (नांदेड), संगीता पवर (सिल्लोड), अश्‍विनी कुंभार (देवळी), प्रियंका जगताप (जालना), अश्‍विनी कोरे (सावनेर), शुभांगी ढगे (बीड), हर्षदा जगताप (औरंगाबाद), प्रिया नवने (जालना), पूनम चव्हाण (औरंगाबाद), माधुरी सुरासे (लातूर), मुक्ताबाई कोकाटे (भातुकली), भाग्यश्री भोसले (नांदेड), मनीषा गवळी (राळेगाव), मनीषा पाटील (भंडारा), मोहिनी जाधव (भद्रावती), स्नेहल शिंदे (शेगाव), प्रतिभा कुताळ (कळम), अमृता सुतार (वर्धा), सुरभी बाविस्कर (कुरखेडा), कीर्ती मोकड (अकोला), सुप्रिया वायवळ (आर्वी), विधा मंडलिक (कोची), काव्यश्री घोलक (रिसोड), कावेरी सुभाष साळे (गोंदिया). 

 हेही वाचा > PHOTOS : सिग्नलवरील "ते' शेवटचे सेकंद अन् ऑडीचालकाची घाई..थराराक!

शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे जन्मत:च शेतीशी नाळ जुळली आहे. मिळवलेल्या पदवीचा वापर शेतकऱ्यांसाठी करता येईल, याचा अभिमान आहे. नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक, सामाजिक, मानसिकदृष्ट्या खचणाऱ्या बळीराजाला नवीन तंत्रज्ञानाद्वारे सक्षम करण्याचा प्रयत्न करेल. - आरती बोरस्ते, नवनियुक्त तालुका कृषी अधिकारी  

हेही वाचा > घरात साधी चिठ्ठी लिहून जेव्हा 'दोघी' पळून जातात तेव्हा.....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90% of the farmers' daughters are included as taluka agricultural officers nashik marathi news