"कोरोनापेक्षा भयंकर आजार बघितलेत, घाबरु नका" कोरोनावर मात करणाऱ्या ९१ वर्षीय आजींची कमाल!

91 years old lady malegaon recovered corona nashik marathi news
91 years old lady malegaon recovered corona nashik marathi news

नाशिक/सोयगाव : संपूर्ण जगावर कोरोनाने आपला विळखा घातला आहे. त्यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. कोणी आपले वडील गमावले, कोणी आपली आई तर कोणी आपले संपूर्ण कुटुंब गमावले. पण या जगात असेही लोक आहेत की कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपल्या घरी परतत आहेत. अशाच एका 91 वर्षाच्या मायमाऊलीने या कोरोना व्हायरसवर मात केली आहे.

मालेगाव शहरातील संगमेश्वर येथे राहणाऱ्या माजी उपमहापौर सखाराम घोडके यांच्या मोठया भगिनी पार्वताबाई नथु बिरारी या 15 दिवसानंतर कोरोनवर मात करीत सुखरूप घरी पोहचल्या आहेत. आजीना कोरोना झाल्याचे समजल्यानंतर त्यांनीच आपल्या कुटुंबियांना धीर देत 'मला काहीही होणर नाही मी सुखरूप घरी पोचेल' अस सांगत आपल्या कुटुंबियांना धीर दिला. योग्य उपचार व संयम दाखवत आजी 15 दिवसाच्या होम कॉरटाइन मध्ये सकारात्मक विचार करत कोरोनाला हरवले. त्यांच्या घरी परातल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अत्यंत आनंदाने स्वागत केले. वयाच्या 91 व्या वर्षी देखील कोरोनावर मात केली आहे, त्यांच्या  प्रबळ इच्छाशक्तीमुळेच आजी घरी सुखरूप आल्या आहेत  हे खरंच प्रेरणादायी आहे.



आमच्या आजीला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर आम्हाला तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती. मात्र माझी काळजी करू नका असे सांगत संपूर्ण कुटुंबियांना मी नक्की बरी होऊन घरी परत येईल असे सांगत होती. तिची इच्छा शक्ती बघून आम्हाला धीर आला. पुढच्या 15 दिवसानंतर कोरोनाला हरवत आमची आजी सुखरूप घरी परतली आहे. त्यामुळे नव्वदी उलटलेली आजी कोरोनाला हरवू शकते तर त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही असा सकारात्मक विचार आम्ही करायला लागलो. आमच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.
- राहुल वाघ, नातू

कोरोनापेक्षा अधिक भयंकर आजार मी बघितले आहेत. जसा मानमोडी, प्लेग असे महाभयंकर आजार येऊन गेले. त्यात गावच्यागावे बसली. त्यांच्या तुलनेत कोरोना हा महाभयंकर आजार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. माझ्यासारखी 91 वर्षाची वृद्ध महिला कोरोनाला हरवू शकते तर तुम्ही तर धठ्ठकट्टे आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका सकारात्मक रहा. 
- पार्वतीबाई बिरारी  

संंपादन - रोहित कणसे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com