थकबाकीदारांसाठी १ नोव्हेंबरपासून अभय योजना; महापालिकेकडून ७५ टक्क्यांपर्यंत सवलत 

विक्रांत मते
Wednesday, 28 October 2020

मागील वर्षाच्या तुलनेत घरपट्टी थकबाकीदारांची संख्या वाढली आहे. २५ हजार ते एक लाख रुपये थकबाकी असलेले ११ हजार ६४० थकबाकीदार, तर एक लाखापेक्षा अधिक थकबाकीदार असलेले दोन हजार ६३१ थकबाकीदार आहेत.

नाशिक : कोरोनामुळे अपेक्षित वसुली होत नसल्याने महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा निर्णय घेतला असून, १ नोव्हेंबरपासून योजना अमलात आणली जाईल. 

महापालिका उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या घरपट्टीतून यंदा अपेक्षित वसुली झाली नाही. नियमित व थकबाकी मिळून तीनशे कोटींच्या वर महसुलाची वसुली होणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षात ६१.९६ लाख रुपये वसुली झाली. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टीचे १०७ कोटींचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यांपैकी अवघे १५.७८ कोटी रुपये वसूल झाले. पाणीपट्टीची ७२.८२ कोटींची थकबाकी आहे. तीन टप्प्यांत योजना राबविली जाणार असून, १ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत थकबाकी अदा केल्यास शास्तीवर ७५ टक्के सवलत दिली जाईल. १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५० टक्के, तर १६ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत २५ टक्के सवलत दिली जाईल. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

थकबाकीदार वाढले 

मागील वर्षाच्या तुलनेत घरपट्टी थकबाकीदारांची संख्या वाढली आहे. २५ हजार ते एक लाख रुपये थकबाकी असलेले ११ हजार ६४० थकबाकीदार, तर एक लाखापेक्षा अधिक थकबाकीदार असलेले दोन हजार ६३१ थकबाकीदार आहेत. अभय योजनेचा कालावधी संपल्यानंतर महापालिकेकडून जप्तीची मोहीम राबविली जाईल. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhay Yojana for arrears from November 1 in municipal corporation nashik marathi news