esakal | थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..
sakal

बोलून बातमी शोधा

abusive boyfriend.jpg

सायंकाळी सातला युवती रस्त्याने जात असल्याचे पाहताच त्याने तिच्या कानपट्टीला पिस्तूल लावत, "माझ्याबरोबर चल, नाही तर गोळ्या घालीन', असे म्हणत तिचा हात धरून फरफटत रेल्वे गेटकडे ओढले. परिसरातील काही युवकांच्या लक्षात संबंधित बाब आली.

थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : युवती लग्नसमारंभात केटरिंगचे काम करत आपला उदरनिर्वाह करत असताना तिची ओळख राजस्थान येथील बाडमेर, जि. डोली येथील संशयित सईराम हरकीनराम विष्णोई (वय 33) येथील युवकाशी झाली. नंतर ते एकमेकांशी फोनवरून बोलत होते. यातूनच त्याने तिला लग्नाची गळ घालत औरंगाबाद येथे भेटायला बोलावले होते. परंतु युवती भेटायला गेली नाही म्हणून त्यांच्यात भांडणे झाले.

"माझ्याबरोबर चल, नाही तर गोळ्या घालीन',

पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी युवती लग्नसमारंभात केटरिंगचे काम करत आपला उदरनिर्वाह करत असताना तिची ओळख राजस्थान येथील बाडमेर, जि. डोली येथील संशयित सईराम हरकीनराम विष्णोई (वय 33) येथील युवकाशी झाली. नंतर ते एकमेकांशी फोनवरून बोलत होते. यातूनच त्याने तिला लग्नाची गळ घालत औरंगाबाद येथे भेटायला बोलावले होते. परंतु युवती भेटायला गेली नाही म्हणून त्यांच्यात भांडणे झाले. रागाच्या भरात तो राजस्थानवरून थेट घोटी शहरातील रामरावनगर येथे गावठी बनावटीचे पिस्तूल कमरेला लावून आला. त्याने फोनवरून युवतीला रेल्वे गेटकडे भेटण्यास बोलावले. मात्र ती गेली नाही. त्या मुळे संशयित दबा धरून परिसरात पीडितेची वाट पाहत राहिला. सोमवार (ता. 20) सायंकाळी सातला युवती रस्त्याने जात असल्याचे पाहताच त्याने तिच्या कानपट्टीला पिस्तूल लावत, "माझ्याबरोबर चल, नाही तर गोळ्या घालीन', असे म्हणत तिचा हात धरून फरफटत रेल्वे गेटकडे ओढले. परिसरातील काही युवकांच्या लक्षात संबंधित बाब आली. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळविली. घटनेचे गांभीर्य पाहता सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पिस्तूलसह परप्रांतीय युवकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक विलास घिसाडी करत आहेत. 

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत

राजस्थानातील युवतीसाठी आला थेट घोटीत ​

राजस्थानातील युवक व घोटी शहरातील रामरावनगरातील युवती... फोनवरून ओळख होऊन दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यातूनच युवतीला लग्नाची गळ घालून युवकाकडून औरंगाबाद येथे बोलविण्यात आले खरे; परंतु युवतीने येण्यास नकार दिल्याने युवकाने थेट घोटी गाठून युवतीच्या कानपट्टीवर पिस्तूल लावत तिला राजस्थानला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक युवक व पोलिसांच्या मदतीने युवकाला ताब्यात घेण्यास यश आले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे. हा थरार सोमवारी (ता. 20) सायंकाळी सातला घडला. 

हेही वाचा > "पप्पा तुम्ही लवकर परत या!" चिमुकल्याची आर्त हाक...काळजाला फोडला पाझर

go to top