एसटीच्या चाकाची गडबड चालकाला समजली...तेवढ्यात अचानक...नदी पुलावरील घटना...! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

सटाणा आगाराची देवळा-कापराई-वाखारी ही बस (एमएच 20, डी 9341) वाखारी येथून देवळ्याकडे येत होती. देवळा येथील कोलती नदीवरील पुलावर असलेल्या भाजीमंडईसमोर अचानक बसचे मागील चाक निखळून बाहेर येऊ लागले. चालक विलास आहेर यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी...

नाशिक/देवळा : सोमवारी (ता. 24) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सटाणा आगाराची देवळा-कापराई-वाखारी ही बस (एमएच 20, डी 9341) वाखारी येथून देवळ्याकडे येत होती. देवळा येथील कोलती नदीवरील पुलावर असलेल्या भाजीमंडईसमोर अचानक बसचे मागील चाक निखळून बाहेर येऊ लागले. चालक विलास आहेर यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित बस थांबविल्याने अपघात टळला. बसमध्ये देवळा येथे महाविद्यालयीन व शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह 65 ते 70 प्रवासी होते. वाहतूक नियंत्रक व्ही. एन. गोसावी, पांडुरंग पवार व प्रवाशांनी चालक आहेर यांचे अभिनंदन केले. 

गावाला काळजी एसटीची 
वाखारी येथील ग्रामपंचायतीने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ठराव करून खासगी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे येथील सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे एस.टी. महामंडळाच्या बसवरच अवलंबून आहे. महामंडळाने वाखारी गावासाठी बस उपलब्ध करून दिली आहे. मात्र येथे पाठविण्यात येणारी बस जुनीच असल्यामुळे ती वारंवार नादुरुस्त होते. त्यामुळे ग्रामस्थ व देवळा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होतो, अशी तक्रार करत, एसटीला महसूल मिळवून देणाऱ्या गावासाठी किमान चांगली बस पाठवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

हेही वाचा > हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..

PHOTOS : सिग्नलवरील "ते' शेवटचे सेकंद अन् ऑडीचालकाची घाई..थराराक!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident avoid Because of the bus driver Nashik Marathi News