esakal | वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव? दुष्टचक्र कधी संपणार?
sakal

बोलून बातमी शोधा

padali accident.jpg

दोन महिन्यांत लॉकडाउनमुळे वाहनांची वर्दळ कमी असूनही चार ते पाच व्यक्तींना जीव गमवावा लागला. मुंबई- नाशिक या अपघातांची मालिका खंडित करावी. त्यासाठी व्हिटीसी फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव? दुष्टचक्र कधी संपणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सर्वतीर्थ टाकेद : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख फाटा येथील हॉटेलजवळ रविवारी (ता. 7) मध्यरात्री दीडच्या सुमारास टेम्पो- कंटेनरच्या अपघातात एकजण ठार, तर एकजण जखमी झाला. महामार्गावरील पाडळी देशमुख ते विल्होळीदरम्यान हा अपघात घडला. गेल्या आठवड्यात या भागात अपघात झाला होता. त्यामुळे येथील अपघातांची मालिका खंडित कधी होणार, असा प्रश्‍न आहे?

अपघातातील जखमीं  खासगी रुग्णालयात

नाशिकहून मुंबईकडे भरधाव जाताना टेम्पोला (एमएच 05, डीके 1034) समोरून चाललेल्या कंटेनरने (एमएच 46 एएफ 2086) मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजेश दुलाल शेख (वय 42) गौतम अथुनी हजमा (40, रा. दोघेही उल्हासनगर, मुंबई) दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याला मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोंदे फाटा येथील एका संस्थानच्या रुग्णवाहिकेमार्फत अपघातातील जखमींना त्वरित नाशिकला खासगी रुग्णालयात दाखल केले असता एकाला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली. 

हेही वाचा > धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण?

अपघाताचे दृष्टचक्र 

महामार्गावर पाडळी फाटा ते विल्होळीदरम्यान दोन महिन्यांत लॉकडाउनमुळे वाहनांची वर्दळ कमी असूनही चार ते पाच व्यक्तींना जीव गमवावा लागला. मुंबई- नाशिक या अपघातांची मालिका खंडित करावी. त्यासाठी व्हिटीसी फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

हेही वाचा > संजय राऊत ऐकलतं का?...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं!'