खातेधारकांना तासन्‌तास बँकेत उभे राहण्याची नामुष्की; ऐन दिवाळीत मनस्ताप

bank 1.jpg
bank 1.jpg

नाशिक : (सिडको) ऐन दिवाळीत सणांमुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी शहरातील विविध बँकांमध्ये खातेधारक सकाळी 11 वाजेपासून रांगा लावतानाचे चित्र बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये बहुतांश ठिकाणी बँकांमध्ये बसण्यासाठी खुर्च्या नाही, सॅनिटायझर नाही, तसेच कर्मचारी सुट्टीवर गेल्याचे दिसून येत असल्याने खातेधारकांना तासनतास उभे राहण्याची नामुष्की येत आहे.

खातेधारकांना तासनतास उभे राहण्याची नामुष्की

दिवाळी म्हटलं की, सगळीकडे आनंद अन् उत्सवाचे वातावरण बघायला मिळते. सण तोंडावर आल्याने आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकांमध्ये खातेधारकांची बॅंकेत गर्दी होत आहे. सकाळी अकरा वाजेपासून रांगा लावतानाचे चित्र बघायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी बँकांमध्ये बसण्यासाठी खुर्च्या नाही, सॅनिटायझर नाही तसेच कर्मचारी सुट्टीवर गेल्याचे दिसून येत असल्याने खातेधारकांना तासनतास उभे राहण्याची नामुष्की येत आहे. त्रंबक नाका ते सीबीएस दरम्यान असलेल्या एसबीआय बँकेत अशीच परिस्थिती बघायला मिळाली. तेथील एका ज्येष्ठ महिला खातेदाराला नागरिकांना तासनतास उभे रहावे लागत असल्यामुळे त्यांनी अखेर खाली बसण्याचा पर्याय निवडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com