नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी : छगन भुजबळ

संतोष विंचू
Sunday, 4 October 2020

उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन लाईनसह राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करून तातडीने सुरू करावेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याच्याही सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.

नाशिक : (येवला) कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सबाबत काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत जनजागृतीसोबतच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. कोरोना व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.३) शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. 

राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावी

यावेळी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, तालुक्याला मिळालेले सर्व व्हेंटिलेटर्स सुरू करण्यात यावेत. ते सुरू झाल्यानंतर त्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व स्टाफची नेमणूक करावी. उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन लाईनसह राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करून तातडीने सुरू करावेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याच्याही सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या. आमदार दराडे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल पाटील, प्रांताधिकारी सोपान कासार, निफाड प्रांतधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाग्रहा, उपअभियंता देवरे, उन्मेष पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजाराम, उपअभियंता प्रजापती, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, सहायक निबंधक एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगावचे खंडेराव रंजवे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action should be taken against those who do not follow the rules - Chhagan Bhujbal nashik marathi news