esakal | मनावर घ्या जरा! उसळलेल्या गर्दीत 'ती' काळजी न घेतल्यास पडेल महागात
sakal

बोलून बातमी शोधा

no mask.jpg

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत उसळलेल्या गर्दीतही काळजी न घेतल्यास जीवावर बेतू शकतं. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय सहा भरारी पथकांची नियुक्ती केली होती. तरीसुध्दा निष्काळजीपणा भोवत आहे,

मनावर घ्या जरा! उसळलेल्या गर्दीत 'ती' काळजी न घेतल्यास पडेल महागात

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बाजारपेठेत वावरताना नागरिकांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले होते. लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय सहा भरारी पथकांची नियुक्ती केली होती.

मास्क न घालणाऱ्या ११४ नागरिकांवर कारवाई 

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत उसळलेल्या गर्दीतही मास्क परिधान न करणाऱ्या तब्बल ११४ नागरिकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली. दंडात्मक कारवाईतून साडेसतरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोळा प्रकारच्या कारवाईतून एक लाख ४५ हजारांची दंडवसुली झाली. आठ दिवसांत नाशिक रोड विभागात २५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

दंड वसूली आणि कारवाई

त्यांच्याकडून चार हजार ८०० रुपये दंड वसुली करण्यात आली. सिडकोत २७ नागरिकांवर कारवाई करताना पाच हजार ४०० रुपयांचा दंड वसूल झाला. सातपूर विभागात दोन जणांकडून चारशे रुपये, तर पश्‍चिम विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. ५९ नागरिकांकडून अकरा हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पूर्व विभागात एका नागरिकावर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या चौघांवर कारवाई करताना सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर घाण टाकणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांना दोन हजार रुपये दंड करण्यात आला. पूर्व विभागात उघड्यावर लघुशंका करणाऱ्या दोघांकडून चारशे रुपये दंड, तर गोदावरी अस्वच्छता करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पश्‍चिम विभागात दोन, तर पूर्व विभागात एकावर कारवाई करण्यात आली. तिघांकडून पाच हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

प्लॅस्टिक वापरावर बंदी 
प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सिडको व पूर्व विभागातील प्रत्येकी एकावर दंडात्मक कारवाई करताना दहा हजार रुपये, तर सातपूर विभागात दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पश्‍चिम विभागात पाच जणांकडून २५ हजार रुपये वसूल करण्यात आले. पंचवटीत एकावर कारवाई करण्यात आली. पाळीव श्‍वानांना रस्त्यावर सोडल्यानंतर घाण केल्याने श्‍वानांच्या मालकांना दंड करण्यात आला. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

मोकळ्या भूखंडावर कचरा 
मोकळ्या भूखंडावर कचरा टाकण्यास बंदी असतानाही आठ दिवसांत दहा जणांवर कारवाई करण्यात आली. नाशिक रोड, सातपूर व पंचवटी विभागात एक, सिडकोत पाच, तर पूर्व विभागात दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३२ हजार २४० रुपयांची दंडवसुली करण्यात आली.