मग काय...त्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनालाच चिटकवले निवेदन..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

प्रांताधिकारी पठारे यांच्याकडे चर्चासंदर्भात वेळ घेऊनही त्या आल्या नाहीत. खासदार डॉ. पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तब्बल एक तास प्रांताधिकाऱ्यांची वाट पाहिली. मात्र त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली नाही. तसेच आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासही नकार दिला.

मग काय त्यांनी प्रातांच्या शासकीय वाहनाला चिटकवले निवेदन

नाशिक / निफाड : पीककर्ज, वीजबिल माफी आदींसह प्रमुख मागण्यांवर नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्‍यात भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. निफाडला देखील भाजपा कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. मात्र आंदोलनाचे निवेदन प्रांतांना देण्यासाठी तहसील कार्यालयावर धडकलेल्या कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यास निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी नकार देत चर्चा केली नाही. तासभर वाट पाहूनही प्रांत न आल्याने यामुळे संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी याचा निषेध नोंदवत प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनास निवेदन चिटकवले.

तहसील कार्यालयावर आंदोलन
शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, लॉकडाउनदरम्यान वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेले वीजबिल माफ करावे, सायखेडा येथील पुलाची उंची वाढवावी, या मागण्यासाठी भाजप खासदार डॉ. भारती पवार, शंकर वाघ, जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांच्या उपस्थितीत निफाड तालुका भाजपतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांस विविध प्रश्‍नांवर जनतेचा आक्रोश घेऊन निफाड तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

कार्यकर्ते आक्रमक
मात्र यावेळी येथील प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्याकडे चर्चासंदर्भात वेळ घेऊनही त्या आल्या नाहीत. खासदार डॉ. पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तब्बल एक तास प्रांताधिकाऱ्यांची वाट पाहिली. मात्र त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली नाही. तसेच आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासही नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी प्रांतांना निवेदन स्वीकारण्यासही वेळ नसल्याचे म्हणत निषेध नोंदविला. खासदार डॉ. भारती पवार, शंकर वाघ, भागवत बोरस्ते, सुखदेव चौरे, डी. के. जगताप, प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, पंढरीनाथ पिठे, परेश शाहा, नंदू नावंदर व भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत थेट प्रांताच्या शासकीय वाहनालाच निवेदन चिटकवत आपला रोष व्यक्त केला.

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​
आंदोलनाकरिता सभापती सुवर्णा जगताप, सचिन धारराव, मनोहर गायकवाड, गौरव वाघ, सुरेखा कुशारे, अंबादास बोराडे, कैलास आव्हाड, उमेश नागरे, भाऊलाल पावडे, बिरजू पठाण, संजय शिरसाट, कैलास गांगुर्डे, उज्ज्वल कायस्थ, कैलास शिंदे, केशव सुरवाडे, घनश्‍याम पानपाटील, अंबादास पानगव्हाणे, जयराम वाघ, माधव शिंदे, शिवाजी चौधरी, सुयश गिते, विजय शिंदे, बबनराव जगताप, नीलेश शिंदे, गोविंद कुशारे, अतुल गरुड, सीमा कुलकर्णी, श्‍याम निफाडे, सोमनाथ शिंदे, पद्मिनी खडताळे, फेरुमल फुलवाणी, जगदीश उगले, आमिन पठाण, दगू कासव, पुंजाराम कडलक, सुदाम कडाळे, दिगंबर बिडवे, पापाभाई सय्यद, सीमा शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: activists stuck the statement to the government vehicle nashik marathi news