‘ॲडम फॅब्रिवर्क्स’च्या कामगारांची दिवाळी! ऐन कोरोना काळात घसघशीत वेतनवाढीचा करार

प्रमोद दंडगव्हाळ
Thursday, 15 October 2020

कोरोना काळात कामगारकपातीचे संकट उभे राहिलेले असताना अंबड येथील एका कंपनीने कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ करून तब्बल २२ कामगारांना कायम केले. 

नाशिक / सिडको : कोरोना काळात कामगारकपातीचे संकट उभे राहिलेले असताना अंबड येथील एका कंपनीने कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ करून तब्बल २२ कामगारांना कायम केले. 

‘ॲडम फॅब्रिवर्क्स’च्या कामगारांची दिवाळी 
नाशिक वर्कर्स युनियन (सीटू) व ॲडम फॅब्रिवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड अंबड कंपनीतील कामगारांच्या सर्वसाधारण मागण्यांच्या मसुद्यावर युनियनचे डॉ. डी. एल. कराड व व्यवस्थापन यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन २२ कामगारांना कायम करण्यात आले. या कराराप्रमाणे सर्व कामगारांना तीन हजार ८३३ ते सहा हजार ४१० रुपये अशी वेतनवाढ देण्यात येईल. तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार वेळोवेळी वाढून येणारा महागाई भत्ता देण्यात येईल. कामगारांना दर वर्षी तीन ते आठ रुपये प्रतिदिन इन्क्रीमेंट देण्यात येईल. १ जानेवारी २०२० पासूनचा वेतनवाढीचा फरकही कामगारांना मिळेल. 

घसघशीत वेतनवाढीचा करार; २२ जण कायम 
या करारावर कंपनीचे डायरेक्टर डी. टी. शिरुडे, व्ही. एम. वाघ, एस. टी. शिरुडे, पी. डी. शिरुडे, एस. बी. भाबड, युनियनतर्फे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, गंगाराम ढोमसे, राजाभाऊ जाधव, सी. आर. सहाने यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कामगारांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केल्याची माहिती ‘सीटू’चे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे यांनी दिली. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

कामगारांना असा लाभ 
सर्व कामगारांना दर वर्षी २० टक्के बोनस देण्यात येईल. दर वर्षी १२ पीएल, आठ सीएल, दहा एसएल व अकरा सणाच्या सुट्या देण्यात येतील. एलटीए पहिल्या वर्षी १५ हजार, दुसऱ्या वर्षी १६ हजार २०० व तिसऱ्या वर्षी १७ हजार ४०० रुपये असा देण्यात येणार आहे. या कराराचा कालावधी १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ असा तीन वर्षांचा राहील.  

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adam Fabricworks workers salary increament nashik marathi news