पोटाच्या खळगीसाठी ‘चुली’चा आधार! चप्पल-बूट दुरुस्तीसोबतच चूल विकून उदरनिर्वाह

अंबादास देवरे
Monday, 5 October 2020

मात्र मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाला. चप्पल-बूट दुरुस्तीच्या व्यवसायाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मात्र उदरनिर्वाहासाठी पत्र्याची चूल व कटलरी साहित्य विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून जिद्दीने कोरोना संकटात जगण्याची उमेद कायम ठेवली आहे. 

नाशिक : (झोडगे) कोरोनाच्या संकटात सापडलेल्या चप्पल-बूट दुरुस्ती व्यावसायिक आपल्या पारंपरिक व्यवसायत मंदीचे सावट असल्याने चप्पल-बूट दुरुस्तीसोबतच पत्र्याची चूल बनविण्यापासून ते कटलरी साहित्य विक्रीपर्यंत अशा इतर व्यवसायांचा आधार घेत उदरनिर्वाह चालवत असल्याचे चित्र आहे. 

कोरोना संकटात जगण्याची उमेद कायम

झोडगे येथे रमेश अहिरे आपल्या पारंपरिक चप्पल-बूट दुरुस्तीच्या कामातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर यांना शेती शिवारात काम करताना मोठ्या प्रमाणावर चप्पल-बूट दुरुस्तीसाठी गावातील कारगिराकडे जाऊन दुरुस्ती करून वापर केली जाते. तर बाजारपेठत रस्त्याच्या कडेला आपले दुकान लावून मिळाणाऱ्या अल्प उत्पन्नात आनंदी असणारे यांच्या उन्हाळी हंगामात व लग्नसराईत मोठ्या प्रमाणावर चप्पल-बूट दुरुस्ती व पॉलिश करून अधिकचे उत्पन्न मिळते. मात्र मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाला. चप्पल-बूट दुरुस्तीच्या व्यवसायाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मात्र उदरनिर्वाहासाठी पत्र्याची चूल व कटलरी साहित्य विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून जिद्दीने कोरोना संकटात जगण्याची उमेद कायम ठेवली आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

पारंपरिक व्यवसायाला इतर उद्योगांची जोड 

ग्रामीण भागातील अनेक बारा बलुतेदार व्यावसायिकांना कोरोना काळातील लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद करून मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र दिसून येत होते. तर अनेकांनी पारंपरिक व्यवसाय काही काळ बंद ठेवून भाजीपाला, फळे विक्री केली. मात्र आता अनलॉकमुळे जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने ते पुन्हा आपल्या व्यवसायाकडे वळलेले दिसतात. तर अनेक छोटे व्यावसायिक एकच व्यवसायावर अवलंबून न राहता लॉकडाउनमध्ये सुरू केलेले व्यवसायपूरक व्यवसाय म्हणून स्वीकारल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा >  एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Addition of other industries to traditional business nashik marathi news