esakal | नाशिक विकासासाठी तब्बल दीडशे केाटी रूपयांचा वाढीव निधी; अजित पवारांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक

बोलून बातमी शोधा

nashik baithak 2.jpg}

 उत्तर महाराष्ट्राच्या पाचही जिल्ह्यांची बैठक आज नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यात जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आढावा बैठकीत राज्य सरकारने नाशिकसाठी तब्बल दीडशे केाटी रूपयांचा वाढीव निधी मंजुर केला आहे

नाशिक विकासासाठी तब्बल दीडशे केाटी रूपयांचा वाढीव निधी; अजित पवारांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उत्तर महाराष्ट्राच्या पाचही जिल्ह्यांची बैठक आज नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यात जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आढावा बैठकीत राज्य सरकारने नाशिकसाठी तब्बल दीडशे केाटी रूपयांचा वाढीव निधी मंजुर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत (ता,१०) नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

उत्तर महाराष्ट्राच्या पाचही जिल्ह्यांची बैठक

विभागीय स्तरावरील या बैठकींना कृषी मंत्री दादा भुसे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, वित्त राज्यमंत्री शंभु राजे देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते,

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

एकुण आराखडा ९५० कोटी रूपयांचा आराखडा

राज्य सरकारने वाढीव दीडशे कोटी रूपयांचा निधी दिल्याने आता नाशिक जिल्ह्याचा एकुण आराखडा ९५० कोटी रूपयांचा आराखडा झाला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेचा हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यामुळे त्यासाठी खास २५ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हॉलसाठी पाच कोटी रूपये देखील मंजुर करण्यात आले आहे.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट