काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

प्रमोद दंडगव्हाळ
Tuesday, 9 February 2021

विवाहसोहळा म्हटला तर खर्च हा आलाच. नातेवाईकांना, मित्रपरिवाराच्या साक्षीने थाटामाटात लग्न करायचं म्हटलं तर साऱ्यांनाच आवर्जून आमंत्रण द्यावं लागतं. हा सामाजिक सोहळा असल्याने त्यात सर्वजण सहभागी होतात. आणि वधू-वराला आशिर्वाद देतात, पण जर तुम्हाला असे समजले की फक्त ५१ रुपयात लग्न लावून मिळत असेल तर...हो हे खरं आहे. केवळ ५१ रुपयात तुम्ही लग्न लावू शकाल...कसं ते वाचा..

सिडको (नाशिक) : विवाहसोहळा म्हटला तर खर्च हा आलाच. नातेवाईकांना, मित्रपरिवाराच्या साक्षीने थाटामाटात लग्न करायचं म्हटलं तर साऱ्यांनाच आवर्जून आमंत्रण द्यावं लागतं. हा सामाजिक सोहळा असल्याने त्यात सर्वजण सहभागी होतात. आणि वधू-वराला आशिर्वाद देतात, पण जर तुम्हाला असे समजले की फक्त ५१ रुपयात लग्न लावून मिळत असेल तर...हो हे खरं आहे. केवळ ५१ रुपयात तुम्ही लग्न लावू शकाल...कसं ते वाचा..

फक्त 51 रुपयात मोफत लग्न

विवाह समारंभ म्हटला की वधू-वरांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. या क्षणाच्या प्रतीक्षेत वधू,वरासह दोन्ही बाजूंकडील मंडळी असतात. मात्र, मागील वर्षा कोरोनाच्या विघ्नामुळे रेशीमगाठी जुळण्यास नव्या मुहूर्ताची वाट पाहावी लागली होती. लग्न सोहळा म्हटला की मोठ्या प्रमाणात खर्च होतो. काहीजण आपल्या आयुष्यातील पुंजी त्यासाठी खर्च करतात, तर काहीजण शेती विकतात. काहीजण कर्ज काढून विवाहसोहळा पार पडतात. यावर्षी अनेक ठिकाणी विवाह जमले, मुहूर्तही ठरला; पण कोरोनाने मुहूर्ताला हरताळ फासला. कोरोनाने अनेकांच्या लग्न सोहळ्यावर विघ्न आणल्याने नव्या जीवनात पदार्पणासाठी विवाहेच्छुकांना खर्चाला फाटा द्यायचा असेल तर हा एक चांगला उपाय मानला जाईल. यामुळे खऱ्या अर्थाने ठरविले तर विवाहसमारंभात होणारा अनावश्यक खर्च वाचू शकतो व नवीन पायंडा पडून कमी लोकांमध्येही विवाह करता येऊ शकेल. यातून होणारे रुसवे-फुगवे, रु ढी-परंपरांना फाटा देऊन एक चांगला पायंडा पडू शकतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

भव्य मोफत सामुदाईक विवाह सोहळा*
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रेरणेतून गरजू कुटुंबामधील पाल्याचा विवाह जमला असेल, तर फक्त ५१ रुपये नोंदणी फी भरून थाटामाटात विवाह सोहळा आयोजित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील कोणीही सदर मोहिमेत सहभागी होऊ शकतात. नवरा-नवरी विवाहसोहळा कपडे, मंगळसूत्र, बॅन्ड, मंडप, संपूर्ण वऱ्हाडीचे जेवण सर्वकाही मोफत राहणार आहे. वधू-वर पालकांच्या कुटुंबांनी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. योगेश दराडे (९०११४९३५५५), संतोष काकडे पाटील (९८५०२१७०४३), राजाराम मुरकुटे सिन्नर (९८८१२७६६३७), बाळा निगळ (९९२२५७८७७७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage for only fifity one rupees nashik marathi news