प्रतिक्षा लांबली! 'एमबीए'चे प्रवेश अंतिम वर्षाच्या परीक्षेनंतरच; वाचा सविस्तर बातमी

अरुण मलाणी
Friday, 18 September 2020

तर गेल्‍या २३ मेस या एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. त्‍यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेची प्रतिक्षा होती. परंतु या दरम्‍यान सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार अंतीम वर्षाच्‍या परीक्षा देणे बंधनकारक केलेले आहे. एमबीए प्रवेशाची पात्रता पदवी शिक्षण पूर्ण केलेले असल्‍याने आता प्रवेशाच्‍या प्रक्रियेत पुन्‍हा एकदा अडथळा निर्माण झाला आहे. 

नाशिक : पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम एमबीएच्‍या सीईटीचा निकाल यापूर्वीच जाहीर झालेला आहे. परंतु पदवीच्‍या पात्रतेवर आधारीत प्रवेश दिले जात असल्‍याने आता अंतिम वर्ष, अंतिम सत्र परीक्षेनंतरच प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. बहुतांश विद्यापीठाच्‍या परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये असल्‍याने ही प्रक्रियादेखील ऑक्‍टोबरच्‍या दुसऱ्या आठवड्यात राबविली जाण्याची शक्‍यता आहे.

ऑक्‍टोबरच्‍या दुसऱ्या आठवड्यात प्रक्रिया 
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विविध पारंपारिक, व्‍यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. बहुतांश सर्वच सीईटी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार झालेल्‍या नाहीत. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता सीईटी सेलमार्फत या सीईटी परीक्षांना स्‍थगिती दिली होती. यापैकी केवळ एमबीए या शिक्षणक्रमासाठीची सीईटी लॉकडाउनपूर्वी पार पडली होती. तर गेल्‍या २३ मेस या एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. त्‍यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेची प्रतिक्षा होती. परंतु या दरम्‍यान सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार अंतीम वर्षाच्‍या परीक्षा देणे बंधनकारक केलेले आहे. एमबीए प्रवेशाची पात्रता पदवी शिक्षण पूर्ण केलेले असल्‍याने आता प्रवेशाच्‍या प्रक्रियेत पुन्‍हा एकदा अडथळा निर्माण झाला आहे. 

सीईटी सेलतर्फे स्‍पष्ट...

सर्वच विद्यापीठांनी अंतिम वर्ष, अंतिम सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमबीएसाठी प्रवेश घेता येणार आहे. त्‍यामूळे अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्‍या निकालावर पुढील प्रक्रिया अवलंबून आहे. ही गोष्ट लक्षात घेत ऑक्‍टोबरच्‍या दुसऱ्या आठवड्यात प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाणार असल्‍याचे सीईटी सेलतर्फे स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

अन्‍य अभ्यासक्रमांवरही परीणाम
 
अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याच्‍या निर्णयामुळे पदवी शिक्षणाची पात्रता असलेल्‍या अन्‍य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेवरही परीणाम होणार आहे. यात प्रामुख्याने विधी शाखेतील तीन वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रम, शिक्षणशास्‍त्र शाखेतील अभ्यासक्रम एमबीसी अभ्यासक्रम आदींची प्रवेशाची प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणार आहे. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission to MBA is only after final year examination nashik marathi news