
डी. एड. शैक्षणिक पात्रतेचे महत्त्व कमी झाल्याने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या शैक्षणिक पटलावर नोकरीसाठी फक्त बी.एड. याच पदवीला प्राधान्य मिळत आहे. त्यातून सध्या तरुणाईचा बी.एड.ची पदवी घेण्याकडे कल वाढला आहे.
येवला (जि.नाशिक) : डी. एड. शैक्षणिक पात्रतेचे महत्त्व कमी झाल्याने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या शैक्षणिक पटलावर नोकरीसाठी फक्त बी.एड. याच पदवीला प्राधान्य मिळत आहे. त्यातून सध्या तरुणाईचा बी.एड.ची पदवी घेण्याकडे कल वाढला आहे.
यंदा ३२ हजार जागांसाठी ४५ हजार अर्ज, आजपासून प्रवेश सुरू
शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळा व खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांतही नोकरीच्या संधी वाढल्याने बी.एड.ला पुन्हा गतवैभव प्राप्त होत असून, यंदा ३२ हजार जागांसाठी तब्बल ४५ हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. मागील दोन-तीन वर्षांत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे नव्याने नोकरभरतीची संधीही उपलब्ध होत असून, पोर्टलद्वारे भरतीचाही पर्याय मिळाला होता. परिणामी पदवीनंतर बी.एड.ला प्रथम प्राधान्य दिले जात आहे.
हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला
१४ जानेवारीपासून प्रवेशप्रक्रिया सुरू
विशेष म्हणजे, दर वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणारी प्रवेशप्रक्रिया यंदा कोरोनामुळे आता होत असली तरी, प्रवेश फुल्ल होतील, हे नक्की.
दरम्यान, बी.एड. प्रवेशासाठीची सीईटी यापूर्वीच झाली आहे. मंगळवार (ता. ५)पासून खऱ्या अर्थाने प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. मंगळवारी तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर होणार असून, त्यातील चुकांची दुरुस्ती झाल्यानंतर १२ जानेवारीला अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध होईल व १४ जानेवारीपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. फेब्रुवारीनंतर महाविद्यालये सुरू होतील व मेमध्ये पहिले वर्ष संपतानाही दिसेल. दुसरीकडे एम.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेशाकडे मात्र अनेक जण दुर्लक्ष करीत असल्याने या वर्षी निम्म्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड
पदवीनंतर बी.एड. करून शिक्षण क्षेत्रात नोकरी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. याशिवाय अनुदानित व विनाअनुदानित शाळा व इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या नोकरीचे पर्याय उपलब्ध होत असल्याने मागील दोन-तीन वर्षांपासून बी.एड.च्या प्रवेशासाठी स्पर्धा होत आहे. -भागवत भड, प्राचार्य, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बाभूळगाव
बी.एड. यापूर्वी एकच वर्षाचे होते. आता दोन वर्षांचे झाले, तरीही पदवीधारकांकडून पसंती मिळत आहे. विशेषत: इंग्रजी शाळांत नोकरीची संधी असल्याने मुलींचा बी.एड.कडे कल दर वर्षीच वाढता आहे.
-दादासाहेब मोरे, प्राचार्य, मातोश्री महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय
यंदाची परिस्थिती (बी.एड.)
* एकूण महाविद्यालये ः ४९६
* अर्ज दाखल ः ४५ हजार ६७९
* पात्र अर्ज ः ४१ हजार ५७५
* अर्ज पडताळणी ः ३६ हजार ६४९
* प्रवेशक्षमता ः ३२ हजार ३९०
(एम.एड.)
* एकूण महाविद्यालये ः ६२
* अर्ज दाखल ः १ हजार ७६१
* पात्र अर्ज ः १ हजार ६०२
* अर्ज पडताळणी ः १ हजार २७७
* प्रवेशक्षमता ः २ हजार ९९५
जिल्ह्यातील स्थिती (बी.एड.)
महाविद्यालये ः २१
एकूण जागा ः १ हजार ५५०
महाविद्यालयनिहाय जागा
एसएनडी, येवला ः १००
मातोश्री, एकलहरे ः १००
मविप्र, नाशिक ः १५०
खातून, मालेगाव ः ५०
मोतीवाला, नाशिक ः ५०
सिटिझन, मालेगाव ः ५०
जेईटी, मालेगाव ः ५०
डी. एस. आहेर, देवळा ः १००
के.के. वाघ, नाशिक ः १००
न्यू बी.एड., नाशिक ः ५०
ब्रह्मा व्हॅली, त्र्यंबकेश्वर ः १००
विश्वसत्य, ओझर ः ५०
पवार, कळवण ः ५०
एमजी, मालेगाव ः १००
सिद्धिविनायक, नांदगाव ः ५०
समर्थ, नाशिक ः ५०
पीव्हीजी, नाशिक ः ५०
अशोका, नाशिक ः १००
बहिणाबाई, नाशिक ः ५०
ज्ञानदीप, मालेगाव ः ५०
मातोश्री, येवला ः १००
प्रवेशाचे वेळापत्रक
* तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर ः ५ जानेवारी
* गुणवत्तायादी जाहीर ः १२ जानेवारी
* पहिली प्रवेश फेरी ः १४ जानेवारी
* प्रवेशनिश्चिती ः १५ ते १८ जानेवारी
* दुसरी गुणवत्तायादी जाहीर ः ५ फेब्रुवारी
* प्रवेशनिश्चिती ः ९ ते ११ फेब्रुवारी
* तिसरी फेरी (महाविद्यालय स्तरावर)
* गुणवत्तायादी जाहीर ः १७ फेब्रुवारी
* महाविद्यालय रिक्त जागा जाहीर ः २३
* अंतिम प्रवेशफेरी ः २४ व २५ फेब्रुवारी
बीएड अर्जांची संख्या
वर्ष - भरलेले अर्ज
२०११-१२ - ५४ हजार
२०१२-१३ - ४५ हजार ५१४
२०१३-१४ - ४० हजार
२०१६-१७ - ८ हजार
२०१७-१८ - ४० हजार
२०१८-१९ - ५३ हजार
२०१९-२० - ५१ हजार
२०१९-२० - ४५ हजार