मुक्‍त विद्यापीठात प्रवेश अर्जाची बुधवारपर्यंत मुदतवाढ

अरुण मलाणी
Sunday, 27 September 2020

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात उपलब्‍ध विविध अभ्यासक्रमांत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ याकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज करण्याची मुदत बुधवार (ता.३०) पर्यंत वाढविली आहे. 

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात उपलब्‍ध विविध अभ्यासक्रमांत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ याकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज करण्याची मुदत बुधवार (ता.३०) पर्यंत वाढविली आहे. 

अर्ज भरण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत

मुक्‍त विद्यापीठाच्‍या विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाइन प्रवेश गेल्‍या २१ जुलैपासून सुरू आहेत. विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी २२ सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपुष्टात आलेली आहे. परंतु राज्‍यभरातील कार्यरत असलेली अभ्यासकेंद्र आणि विद्यार्थ्यांची मागणी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्‍हणून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बी.एड. आणि कृषी शिक्षणक्रम वगळून अन्‍य विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी बुधवार (ता.३०) पर्यंत मुदत असेल असे मुक्‍त विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission to a open university Application deadline is Wednesday nashik marathi news