
१२ जणांवर उद्यान विभागाच्या निरीक्षक माधुरी गायकवाड यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र राज्य नागरीक्षेत्र झाडांचे जतन, महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपिकरण प्रतिबंध कायदा, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.
जुने नाशिक : वृक्षांना खिळे मारून बेकायदेशीररीत्या जाहिरात फलक लावण्याचा प्रकार पूर्व विभागात उघडकीस आला. जाहिरात लावणारे संस्थाचालक तसेच फलकांमध्ये नाव असलेले नागरिक, अशा १२ जणांवर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात प्रकार उघड
जाहिरातीचे पैसे वाचविण्यासाठी अनेक व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्था वृक्षांना खिळे मारून तसेच तारीने बांधून त्याचे जाहिरात फलक लावत असतात. त्यामुळे वृक्षांना इजा होते. याशिवाय शहर विद्रूपीकरण करण्याचा प्रकार केला जातो. असा प्रकार महापालिका पूर्व विभागातील जुना सायखेडा रोड, तिगरानिया ते तपोवन लिंक रोड, काठे गल्ली दुतर्फा वृक्षांच्या बाबतीत घडला. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात हा प्रकार उघड झाला. या वृक्षांवर बेकायदेशीरीत्या लावलेल्या जाहिरात फलकावरील व्यावसायिक संस्था आणि नाव, मोबाईल नंबर असलेल्या १२ जणांवर उद्यान विभागाच्या निरीक्षक माधुरी गायकवाड यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र राज्य नागरीक्षेत्र झाडांचे जतन, महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपिकरण प्रतिबंध कायदा, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?
यांच्यावर गुन्हा दाखल
ओंकार कंगले, होम लोन-पर्सनल लोन, केक किंग, मेट्रो लॅमिनेटस, लोकेश लॅमिनेटस ॲन्ड प्लायवूड, श्री इच्छामणी स्नॅक्स ॲन्ड कोल्ड्रिंक्स, हिरा ॲकॅडमी, मीनाक्षी टिफीन सर्व्हिस, एअरटेल एक्स्टीम फायबर, अस्सल मरामोळ, स्कॉलर हब क्लासेस, नासीर मोटार गॅरेज.
हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले!