esakal | एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 
sakal

बोलून बातमी शोधा

foriegn education.jpg

परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे एका तरुणाचे स्वप्न क्षणार्धातच मातीत मिसळले. केवळ एकाच व्यवहाराने खेळ संपला..काय घडले नेमके?

एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे एका तरुणाचे स्वप्न क्षणार्धातच मातीत मिसळले. केवळ एकाच व्यवहाराने खेळ संपला..काय घडले नेमके?

जर्मनीत जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे आश्वासन

राजेंद्र गोविंद सोनवणे (जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२० या कालावधीत दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन आले व जर्मनीत जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले आयईएलटीएसह परीक्षेचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक ती कागदपत्रे मिळवून देण्याचे आश्वासन समोरच्या भामट्याने दिले. त्यासाठी त्याने पैशांची मागणी केली.

एका व्यवहाराने स्वप्न धुळीस

प्रमाणपत्र थेट मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत सोनवणे यांनी त्या अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करत सुमारे ७ लाख ६ हजार ८३८ रुपये ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे पाठविले. यानंतर संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार;  गुन्हा दाखल

सोनवणे यास ज्या दोन कमांकांवरून फोन आले ते उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून तंत्रविश्लेषण शाखेच्या माध्यमातून केला जात आहे. जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या एका युवकाला संशयित सायबर गुन्हेगाराने तब्बल ७ लाख ६ हजार ८३८ रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी युवकाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा