मालेगावात बकरी ईदची कुर्बानी तर दिली जाईल...पण खरे आव्हान 'हे' असेल..वाचा सविस्तर

प्रमोद सावंत
Wednesday, 29 July 2020

शहरात शासनाच्या आवाहनानुसार बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तात्पुरते कत्तलखाने महापालिका प्रशासनाकडून उभारण्यात येणार नाहीत. त्यामुळे बकरी ईदसाठी घरोघरी गल्ली, मोहल्ल्यांत होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीनंतर प्रशासनासमोर खरे आव्हान तर हे असेल...वाचा सविस्तर...

नाशिक / मालेगाव  : शहरात शासनाच्या आवाहनानुसार बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तात्पुरते कत्तलखाने महापालिका प्रशासनाकडून उभारण्यात येणार नाहीत. त्यामुळे बकरी ईदसाठी घरोघरी गल्ली, मोहल्ल्यांत होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीनंतर प्रशासनासमोर खरे आव्हान तर हे असेल...वाचा सविस्तर...

प्रशासनासमोर हे खरे आव्हान

मालेगाव शहरात शासनाच्या आवाहनानुसार बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तात्पुरते कत्तलखाने महापालिका प्रशासनाकडून उभारण्यात येणार नाहीत. त्यामुळे बकरी ईदसाठी घरोघरी गल्ली, मोहल्ल्यांत होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीनंतर आचरट व कचरा उचलण्याचे, तसेच दैनंदिन स्वच्छतेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्याने तीस ट्रॅक्टर लावून कचरा उचलणे, जंतुनाशक फवारणी, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी संदर्भात मंगळवारी (ता.२८) बैठकीत नियोजन करण्यात आले. 

हेही वाचा > संपूर्ण गाव हादरले! विहीरीत तरंगणारी 'ती' गोष्ट पाहिली..खुलासा होताच कुटुंबियांचा आक्रोश

३० ट्रॅक्टर लावण्याचा निर्णय 
बकरी ईदच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीतही महापौर व स्थायी समिती सभापतींमध्ये शहकाटशहचे राजकारण दिसून आले. स्थायी सभापती डॉ. खालीद परवेज यांनी दुपारी चारला आयुक्तांसह स्वच्छता विभागाची बैठक ठेवली होती. या बैठकीपूर्वी महापौर ताहेरा रशीद शेख यांनी सकाळी अकरालाच नियोजनाची बैठक उरकली. या वेळी तात्पुरते कत्तलखाने नसल्याने १५ ऐवजी ३० ट्रॅक्टर लावण्याचा निर्णय घेतला. स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखी यांनी स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, कचरा उचलण्याचे नियोजन याबाबत माहिती दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मैला डेपोवर खड्डा खोदून बकरी ईदनिमित्तचा कचरा कंपोष्ट करायचा व डेपोवरही औषध फवारणीचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा > अखेर गुढ उकलले! घनदाट घाटात आढळलेल्या संशयास्पद प्रकाराचा पोलीसांनी लावला छडा.. असा रचला प्लॅन​

तीन प्रभागांसाठी नियोजन 
शहरातील प्रभाग १ वगळता अन्य तीन प्रभागांसाठी हे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता विभाग व प्रभाग अधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या. टाकाऊ मासाची विल्हेवाट लावण्यावर व स्वच्छतेवर या काळात भर द्यावा. साथ रोग निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे श्रीमती शेख व डॉ. परवेज यांनी सांगितले. सकाळी बैठक पार पडल्यानंतर स्थायी सभापतींना अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. बैठकीस आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, शहर अभियंता कैलास बच्छाव, मुख्य लेखापाल कमरुद्दीन शेख, पाणीपुरवठा अभियंता सचिन माळवाळ, सहाय्यक आयुक्त अनिल पारखी आदींसह प्रभाग अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. 

रिपोर्ट - प्रमोद सावंत

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the Eid challenge of trash malegaon nashik marathi news