लस घेतल्यानंतरही नाशिकचे विभागीय आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह! लसीच्या परिणामकारकतेबाबत शंका उपस्थित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

 राज्यात कोरोनाचा धोका वाढू लागला असून दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. अशातच कोरोना नियंत्रित आणण्यासाठी शासनाने आणलेल्या लसीबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले आहेत.

नाशिक :  राज्यात कोरोनाचा धोका वाढू लागला असून दिवसेंदिवस संख्या वाढत चालली. अशातच कोरोना नियंत्रित आणण्यासाठी शासनाने आणलेल्या लसीबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले आहेत. कारण लस घेतल्यानंतरही अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच अनेक नेतेमंडळीही आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. अशातच आणखी एक चिंता वाढविणारी बातमी समोर येतेय. नाशिकचे विभागीय आयुक्त यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

लस घेतल्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गमे यांनीही दोनच दिवसांपूर्वी (ता. १७) फेब्रुवारी रोजी लस घेतली मात्र दोनच दिवसांत त्यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील विविध जिल्हयात अधिकार्‍यांनी लस घेतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने लसीच्या परिणामकारकतेबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after vaccination Nashik Divisional Commissioner Corona positive marathi news