नगरपरियोजनेविरोधात शेतकरी थेट न्यायालयात; मनपा, स्मार्टसिटी कंपनीला नोटीस

विक्रांत मते
Wednesday, 14 October 2020

प्रस्तावाला मंजुरी देताना शेतकऱ्यांकडून हरकती व सूचना मागविणे गरजेचे होते. शासनाच्या नगररचना संचालकांनी त्यासंदर्भात सूचना देऊनही दखल न घेता एकतर्फी निर्णय देण्यात आला. प्रकल्पाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा असलेल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर प्रकल्प रद्द करण्याच्या सूचना होत्या.

नाशिक : स्मार्टसिटीअंतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी येथे ७५३ एकर क्षेत्रांत राबविल्या जाणाऱ्या नगरपरियोजनेचा अंतिम उद्देश घोषणेच्या प्रसिद्धीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यानुसार न्यायालयाने स्मार्टसिटी कंपनीसह महापालिकेला नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांच्या याचिकेवर २० ऑक्टोबरला सुनावणी होईल. 

मनपा, स्मार्टसिटी कंपनीला नोटीस 

स्मार्टसिटी कंपनीच्या ग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत हनुमानवाडी व मखमलाबाद शिवारात ७५३ एकर क्षेत्रांत हरितक्षेत्र विकास योजना राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून योजना अमलात आणली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत योजनेचा अंतिम उद्देश घोषणेच्या प्रसिद्धीला मंजुरी देण्यात आली. प्रस्तावाला मंजुरी देताना शेतकऱ्यांकडून हरकती व सूचना मागविणे गरजेचे होते. शासनाच्या नगररचना संचालकांनी त्यासंदर्भात सूचना देऊनही दखल न घेता एकतर्फी निर्णय देण्यात आला. प्रकल्पाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा असलेल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर प्रकल्प रद्द करण्याच्या सूचना होत्या. त्या डावलून प्रस्ताव मंजूर केल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Against urban planning Farmers in court nashik marathi news