#COVID19 : घरपोच भाजीपाला पॅक पोहचविण्याचा उपक्रम....कृषीमंत्र्यांची संकल्पना!

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा.
रविवार, 29 मार्च 2020

समितीतील आडत शेडमध्ये कामगार व काही कार्यकर्त्याच्या मदतीने शेतमालातील आठ विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रत्येकी साडेपाच ते सहा किलो वजनाचे अकराशे पँकेट तयार करण्यात आले. ट्रकमधून हा भाजीपाला आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे रवाना करण्यात आला. तेथे ठाणे परिसरात प्रती पॅकेट शंभर रूपये याप्रमाणे ना नफा ना तोटा तत्वावर त्याची विक्री होणार आहे. ​

नाशिक/ मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत गर्दी टाळणे महत्वाचे आहे.  तथापी राज्यात विविध बाजार समिती व भाजीबाजारात होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातून वाशी व मुंबईतील दादरचा बाजारही बंद करण्यात आला. त्यासाठी घरपोच भाजीपाला पॅक पोहचविण्याचा प्रायोगिक उपक्रम राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ना नफा ना तोटा तत्वावर झालेल्या या प्रयोगामुळे शेतकरी व ग्राहक दोघांचे समाधान होणार आहे. 

प्रयोगाचा पहिला प्रयत्न !
घरपोच आठ भाजीपाला पँक या प्रयोगाचा पहिला प्रयत्न म्हणून रविवारी(ता.२९)  ठाण्याला सात टन सुमारे अकराशे भाजीपाल्याचे पँक भुसे यांच्या हस्ते रवाना करण्यात आला. यासाठी बाजार समितीचे भाजीपाला खरेदीदार आडत व्यापारी देवा वाघ यांनी मोलाचे सहाय्य केले. 

कसमादे भागातून आलेला भाजीपाला व फळभाज्या रवाना
वाघ यांनी समितील कसमादे भागातून आलेला भाजीपाला व फळभाज्यांची शेतकरीं कडून लिलावात खरेदी केली. समितीतील आडत शेडमध्ये कामगार व काही कार्यकर्त्याच्या मदतीने शेतमालातील आठ विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रत्येकी साडेपाच ते सहा किलो वजनाचे अकराशे पँकेट तयार करण्यात आले. ट्रकमधून हा भाजीपाला आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे रवाना करण्यात आला. तेथे ठाणे परिसरात प्रती पॅकेट शंभर रूपये याप्रमाणे ना नफा ना तोटा तत्वावर त्याची विक्री होणार आहे. यासाठी दादा भुसे, समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, वाघ, युवासेनेचे विस्तारक अविष्कार भुसे, राजू अलिझाड, भरत देवरे, राजेंद्र पवार व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​

पाकीटात या आहेत भाज्या.
कांदा, बटाटा, टोमँटो, सिमला मिरची, शेवगा, हिरवी मिरची, कोबी व काकडी. 

विविध भागात काही ट्रक पाठविण्याचे नियोजन

आज प्रायोगिक एक ट्रक पाठविला. येथील बालाजी लाँन्समध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून आज आणखी पँकींग करू. सोमवारी मुलुंड, ठाणे, मुंबई, वरळी आदी भागात काही ट्रक पाठविण्याचे नियोजन आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास सर्वांच्या सहकार्याने तो निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करू - दादा भुसे.
कृषीमंत्री.

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister Dada bhuse concept Home delivery of vegetable packs nashik marathi news