नांदगाव हत्याकांड ब्रेकिंग : ''गुन्हेगारांना फासावर लटकवा'' ग्रामस्थांचा शवचिकित्सागृहासमोर ठिय्या; कृषिमंत्री भुसेंची ग्रामस्थांना भेट..पाहा VIDEO

प्रमोद सावंत
Friday, 7 August 2020

मालेगाव तालुक्यातील जेउर रस्त्याच्या लगत कुटुंबातील पती-पत्नी व दोघा लहान मुलांची निर्घूण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे मालेगाव - नांदगाव तालुका हादरला आहे. मालेगाव पोलीसांपुढे या हत्याकांडाच्या तपासाचे आव्हान आहे

नाशिक/ नांदगाव  : मालेगाव तालुक्यातील जेउर रस्त्याच्या लगत कुटुंबातील पती-पत्नी व दोघा लहान मुलांची निर्घूण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे मालेगाव - नांदगाव तालुका हादरला आहे. मालेगाव पोलीसांपुढे या हत्याकांडाच्या तपासाचे आव्हान आहे. नांदगाव हत्याकांड मयतांची मालेगाव सामान्य रूग्णालयात शवचिकित्सा सुरू करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांनी रूग्णालय आवारातील शवचिकित्सागृहासमोर ठिय्या मांडला. तसेच गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून फासावर लटकवण्याची मागणीही केली.

कृषीमंत्री दादा भुसेंची ग्रामस्थांना भेट.
कृषीमंत्री दादा भुसे यांनी रूग्णालय आवारात ग्रामस्थांची भेट घेतली. तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करा. आवश्यक माहिती द्या. असे आवाहन मालेगाव पोलीसांना केले. पोलिस या घटनेचा लवकरच छडा लावतील असा विश्वास देखील भुसेंनी दर्शविला. यावेळी गुन्हेगाराचा शोध घेवू. मालेगाव, नांदगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा अश्या तीन पथकांनी तपास सुरू केल्याची ग्रामीण उपअधिक्षक शशिकांत शिंदे यांनी .माहिती दिली.

हेही वाचा > ब्रेकिंग : नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात..थरारक घटना

मालेगाव तालुक्यातील जेउर रस्त्याच्या लगत कुटुंबातील पती-पत्नी व दोघा लहान मुलांची निर्घूण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे मालेगाव - नांदगाव तालुका हादरला आहे. मालेगाव पोलीसांपुढे या हत्याकांडाच्या तपासाचे आव्हान आहे. समाधान आण्णा चव्हाण( ३७) भरताबाई चव्हाण  (३२) गणेश समाधान (६)आरोही समाधान चव्हाण( ४) अशा एकाच कुटुंबातील ही हत्या करण्यात आल्याने अख्खा तालुका हादरला आहे. पहाटेच रिक्षा चालक समाधान चव्हाण त्याची पत्नी मुलगा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister dada Bhuse visit to the villagers nandgaon murder nashik marathi news