अहमदाबादपाठोपाठ नाशिक-पुणे विमानसेवा सुरळीत; प्रवाशांचा मात्र अल्प प्रतिसाद

विक्रांत मते
Thursday, 24 September 2020

कोरोनामुळे बंद करण्यात आलेली अहमदाबाद, पुणे व हैदराबाद विमानसेवा पुन्हा नव्याने सुरू झाली असून, अहमदाबाद हवाई सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर पुणे सेवेला वेळेमुळे अल्प प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती एअरपोर्ट व्यवस्थापनाकडून देण्यात आली. 

नाशिक : कोरोनामुळे बंद करण्यात आलेली अहमदाबाद, पुणे व हैदराबाद विमानसेवा पुन्हा नव्याने सुरू झाली असून, अहमदाबाद हवाई सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर पुणे सेवेला वेळेमुळे अल्प प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती एअरपोर्ट व्यवस्थापनाकडून देण्यात आली. 

अहमदाबादपाठोपाठ नाशिक-पुणे विमानसेवा सुरळीत 
गेल्या आठवड्यात अहमदाबाद-नाशिक विमानसेवेचे पहिले उड्डाण झाले. ७२ आसनी विमानात पहिल्या दिवशी अवघे पाच प्रवासी मिळाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. सध्या तीस प्रवासी दररोज प्रवास करत आहेत; परंतु मार्चपूर्वी जेवढा प्रतिसाद होता तेवढा मिळत नाही. लॉकडाउनपूर्वी ७२ आसने पूर्ण क्षमतेने भरत होती. सकाळी साडेदहाला हैदराबाद येथून नाशिकला विमान पोचते, त्यानंतर एक तासात अहमदाबाद येथे पोचते. सायंकाळी साडेसहाला पुन्हा ओझर विमानतळावर आल्यानंतर सातला पुन्हा उड्डाण होते.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

प्रवाशांचा प्रतिसाद मात्र अल्प 

२४ सप्टेंबरपासून नाशिक-पुणे हवाई सेवा नियमित सुरू झाली आहे. एअर अलायन्सच्या विमानाचे सायंकाळी सहाला पुण्याहून उड्डाण होते. सायंकाळी सव्वासातला ओझर येथे पोचते. रात्री आठला पुण्याकडे पुन्हा उड्डाण होते. नाशिक-पुणे विमानसेवेला वेळेमुळे प्रतिसाद मिळत नाही. पुण्याहून नाशिकला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे; परंतु रात्री आठला पुण्याकडे जाणारे प्रवासी अत्यंत कमी आहेत.  

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmedabad Nashik-Pune flights are running smoothly marathi news