esakal | "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती
sakal

बोलून बातमी शोधा

anil pawar gangamai.jpg

कवी कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेत विदारक स्थितीचे वर्णन आजवर वाचत किंवा ऐकत आलो. परंतु शनिवारी (ता. १९) रात्री विटावे (ता. चांदवड) येथील अनिल रायाजी पवार यांच्याबाबतीत हे खरोखर घडल्याने जणूकाही कवितेतील नायक अनिल पवारच ठरावेत असा अनुभव त्यांनी घेतला आहे. काय घडले वाचा...

"अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

sakal_logo
By
विजयराम काळे

नाशिक / रेडगाव खुर्द : कवी कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेत विदारक स्थितीचे वर्णन आजवर वाचत किंवा ऐकत आलो. परंतु शनिवारी (ता. १९) रात्री विटावे (ता. चांदवड) येथील अनिल रायाजी पवार यांच्याबाबतीत हे खरोखर घडल्याने जणूकाही कवितेतील नायक अनिल पवारच ठरावेत असा अनुभव त्यांनी घेतला आहे. काय घडले वाचा...

ती काळरात्र... भेदरलेल्या अवस्थेतील कुटुंब... 

त्या रात्रीच्या पुराने अनिल पवार यांच्या घरात पाणी होण्यास प्रारंभ झाल्यामुळे काही काळ कुटुंब धास्तावले; परंतु पाण्याचा वेग अधिकच वाढत असल्याने संपूर्ण कुटुंबाने त्या जीवघेण्या पुरातून आयुष्याची संपूर्ण पुंजी येथेच सोडत जीव वाचविण्यासाठी त्या काळोख्या अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले. त्यामुळे भिंत खचली, चूल विझली, जीव मात्र वाचल्याचा अनुभव त्यांनी घेतला. संपूर्ण घरात पाणी शिरून संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या, तर काहींचे नुकसान झाले. घर बांधण्यासाठी घेतलेली वाळूही पुरासोबत वाहून गेली. उदरनिर्वाह चालविणारी नऊ बिघे जमीन माती पिकांसह वाहून गेली. यामुळे आता फक्त दगड आणि मुरूम उरला आहे.

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

जिथे मातीच वाहून गेली, तिथे कांद्याचे काय?

महापूर येऊन गंगामाई घरात घुसल्याने ‘होते नव्हते सगळे घेऊन गेली. चाळीतील कांदा संपूर्णपणे भिजला आहे. सहा बिघे जमिनीत कांदे लावले होते, परंतु जिथे मातीच वाहून गेली, तिथे कांद्याचे काय? संपूर्ण संसार आणि जमीन वाहून गेल्याने ग्रामस्थांनी त्यांची सोय आता गावात केली आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

गंगामाईने होते नव्हते सगळे नेले... 

अनिल यांचे कुटुंब दोन दिवसांपासून आपली काळी आई (माती) आणि संसारोपयोगी वस्तू किती लांब वाहून गेल्या आणि कुठे असतील या चिंतेत ते गुंतले आहेत. घटनेचा पंचनामा तलाठी व्ही. व्ही. राऊत यांनी केला असून, या ठिकाणी आमदार डॉ. राहुल आहेर, तहसीलदार प्रदीप पाटील, कृउबा सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, नितीन गांगुर्डे, नितीन आहेर यांनी भेट दिली. तालुक्यात अनेकांचे संसार पुरासोबत वाहून गेले आहेत.