"नागपूर जिल्ह्यासाठी जादा निधी वळवून घेतला होता"...अजित पवारांचा गौप्यस्फोट..

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

महाविकास आघाडी सरकारने नागपूरला अपुरा निधी दिल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी फेटाळून लावला. जिल्हा नियोजन समित्यांना निकषानुसार निधी वाटप केले. उलट भाजप सरकारच्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यातील निधी कपात करुन नागपूर जिल्ह्यासाठी 237 कोटीचा जादा निधी वळवून घेतला होता.असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टिकेला उत्तर दिले. 

नाशिक : कमी गुण मिळविणारा मुलगा हुशार विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यापेक्षा जास्त व्यवहारीक असू शकतो. त्यामुळे जास्त गुण मिळविणारा मुलगाच जास्त व्यवहारिक असलेच असे नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टिकेला उत्तर दिले. 

नागपूर जिल्ह्यासाठी 237 कोटीचा जादा निधी वळवून घेतला होता

महाविकास आघाडी सरकारने नागपूरला अपुरा निधी दिल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी फेटाळून लावला. जिल्हा नियोजन समित्यांना निकषानुसार निधी वाटप केले. उलट भाजप सरकारच्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यातील निधी कपात करुन नागपूर जिल्ह्यासाठी 237 कोटीचा जादा निधी वळवून घेतला होता.असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. निवडणूकीच्या तोंडावर भाजप सरकारने घाईघाईत मराठवाडा ग्रीडचा निर्णय घेतला असून त्यातील व्यवहार्यतापाहिली गेलेली नाही.असे आम्हाला काही आधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावरुन आम्ही फक्त भाजप सरकारच्या काळातील काही घाईघाईत घेतलेल्या निर्णयाची तपासणी करतो आहे. निर्णयाची फेरतपासणी करण्यात गैर काय आहे. असे देखील अजित पवार म्हणाले. 

फडणवीसांच्या टिकेला अजित पवारांचे उत्तर...

फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टिका करतांना, कमी गुण मिळविणारे सत्तेत आणि जास्त गुण मिळविणारे बाहेर अशा शब्दात टिका केली होती. त्याला उत्तर देतांना अजित पवार आज(ता.३१) बोलत होते. 
राज्यातील मोठ्या जिल्ह्याच्या विभाजनाचा तूर्तास कुठलाही विचार नाही. एका नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी 1 हजार कोटी रुपये लागतात. महाविकास आघाडीपुढे शेतकरी कर्जमाफीसह इतर महत्वाचे आर्थिक प्राधान्यांचे विषय असल्यामुळे जिल्हा निर्मितीचे विषय तूर्तास तरी प्राधान्यक्रमांवर नाहीत. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

केंद्राच्या बजेटमध्ये राज्याला काय मिळते.. काय मिळणार नाही

भाजप सरकारने आघाडी सरकारच्या अनेक निर्णयाची फेरतपासणी केलीच होती. त्यानुसारच तपासणी सुरु आहे. याचा अर्थ भाजपच्या योजनांना विरोध सुरु आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे.केंद्राचा हलवा तयारदेशातील बेरोजगारी, महागाई सारख्या प्रश्नांवर केंद्रशासनाला महत्वाचे व मोठे निर्णय घ्यावे लागणार आहे. सध्या केंद्राच्या बजेटचे काम अंतिम टप्प्यात आले असेल त्यामुळे केंद्राकडे कुठलीही मागणी केलेली नाही. केंद्राच्या बजेटमध्ये राज्याला काय मिळते काय मिळणार नाही. हे पाहून राज्याच्या बजेट सादर होईल. असेही पवार यांनी सांगितले. 

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar on Devendra Fadnavis Nashik Marathi political News