esakal | "हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो" नाशिकच्या थंडीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी!
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar 1.jpg

माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा. पण दहा वाजता मला बैठका आहेत. मी सकाळी इतक्या लवकर येईन का, अशी चर्चा होती. मात्र एक जण म्हणे हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या थंडीत भल्या पहाटेच तुफान फटकेबाजी केली..अन् अक्षरश: हास्याचे कांरजे उडाले.

"हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो" नाशिकच्या थंडीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा. पण दहा वाजता मला बैठका आहेत. मी सकाळी इतक्या लवकर येईन का, अशी चर्चा होती. मात्र एक जण म्हणे हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या थंडीत भल्या पहाटेच तुफान फटकेबाजी केली..अन् अक्षरश: हास्याचे कांरजे उडाले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी सकाळी लवकरच भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावली.  

सकाळी सात वाजता घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथ सोहळ्याची आठवण...

नाशिक, धुळे, जळगावस अहमदनगर इथले आमदार मला  सांगत होते. काही जण चर्चा करत होते, मी सकाळी इतक्या लवकर येईन का, त्यावर दुसरा म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. अजित पवार दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी अजित पवारांनी नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीसांच्या साथीने सकाळी सात वाजता घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथ सोहळ्याची आठवण काढली. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

 छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांचा खुर्चीवरुन वाद? हे खोटं आहे...

एकत्र आलेल्या पक्षांची विचारधारा वेगळी आहे, मात्र समाजाच्या भल्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझे आणि अशोक चव्हाणांचे वाद सुरु आहेत. यावरून पेपरमध्ये उलटसुलट बातम्या येतात.  छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांचा खुर्चीवरुन वाद झाला, मात्र हे खोटं आहे. सरकार चालण्यासाठी शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. बातम्या येत असल्या तरी लक्षात ठेवा कोणी तरी चावटपणा करत आहे. माझ्यामुळे जे सुर्यमुखी आहेत, त्यांना त्रास झाला. त्याबद्दल अजित पवारांनी माफी मागितली. 

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...