esakal | बॉलिवूडचा खिलाडी..नाशिकमध्ये 'तो' आला.. गेला.. अन्‌ गाजलाही..! 
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar 2.jpg

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षयकुमार दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आला, त्या वेळी झाली नसेल तेवढी चर्चा तो मुंबईत परतल्यावर दोन दिवसांनी येथे झाली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अक्षयला हेलिकॉप्टर वापरण्यापासून रिसॉर्टमध्ये मुक्कामाची परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले; परंतु....

बॉलिवूडचा खिलाडी..नाशिकमध्ये 'तो' आला.. गेला.. अन्‌ गाजलाही..! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षयकुमार दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आला, त्या वेळी झाली नसेल तेवढी चर्चा तो मुंबईत परतल्यावर दोन दिवसांनी येथे झाली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अक्षयला हेलिकॉप्टर वापरण्यापासून रिसॉर्टमध्ये मुक्कामाची परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले; परंतु दोन तासांनी आपल्याच विधानाचा विपर्यास झाल्याचे सांगत अक्षय निसर्गोपचारासाठी आला व त्याच्या बंदोबस्तासाठी शहर पोलिस नसल्याचा खुलासा त्यांनी केला. मात्र दिवसभराच्या या सर्व संशयकल्लोळात अक्षयला सहानुभूती मिळून तो लॉकडाउन काळात भाव खाऊन गेला. 

तो आला, गेला अन्‌ गाजलाही..! 
अभिनेता अक्षयकुमार दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला होता. मंत्र्यांना हेलिकॉप्टर वापरासाठी परवानगी नसताना तो हेलिकॉप्टरमधून आलाच कसा? त्याला ग्रेप काउंटी रिसॉर्टमध्ये मुक्कामाची परवानगी मिळालीच कशी? ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त असताना शहर पोलिसांनी त्याला बंदोबस्त दिलाच कसा, या प्रश्‍नांचा भडिमार पालकमंत्री भुजबळ यांच्यावर झाल्यानंतर त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. याबाबतचे वृत्त देशभर पोचल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री भुजबळ यांनी माहिती घेतली असता अक्षय उपचारासाठी नाशिकला आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आले. अक्षयकुमार डॉ. आशर यांच्याकडे उपचारासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड

अक्षय भाव खाऊन गेला 
अक्षयकुमारचा जलवा कोरोनाच्या काळातही कायम असल्याचे दिसून आले. अक्षयला नाशिकमध्ये मार्शल आर्टस अकादमी व मेडिटेशन सेंटर सुरू करायचे आहे; परंतु त्याच्या दौऱ्याला राजकीय वळण लागल्यानंतर त्याच्या बाजूने सोशल मीडियावर सहानुभूतीची लाट निर्माण झाली. नाशिकला अक्षयच्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभारले जात असतील, तर त्याच्या दौऱ्याचे भांडवल करण्याची आवश्‍यकता नसल्याचे अक्षयप्रेमींनी सोशल मीडियावर मारा करून नाशिकसाठी त्याचे काम किती योग्य आहे याचे दाखले दिले. 

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​

अक्षय अभिनंदनास पात्र 
अक्षयने कोरोना काळात महत्त्वाचे काम केले आहे. नाशिक पोलिसांना स्वनिधीतून अक्षयने कोरोना बचावासाठी मनगटी घड्याळे दिली. त्याबद्दल पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अभिनंदनाचे पत्र त्याला दिले. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील पोलिस ताफ्यासह त्र्यंबकला गेल्याने ग्रामीण भागात नाशिक पोलिसांचा बंदोबस्त पुरविल्याचे सांगितले गेले; परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चांगले काम केल्याने नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. नाशिक पोलिसांनी अक्षयला कुठलीही सुरक्षा पुरविली नसल्याचे स्पष्टीकरण श्री. भुजबळ यांनी दिले. 

go to top