मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी 'ते' भेटले..त्यांच्याकडील वस्तू पाहून पोलीसांना धक्काच बसला!

kalwan police karvai 1.jpg
kalwan police karvai 1.jpg
Updated on

नाशिक/ कळवण : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना कळवण पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून आठंबे (ता. कळवण) परिसरात अटक केली. त्यांच्याकडून हत्यारे व कॉलिस गाडी जमा केली. 
कॉलिस गाडी नांदुरीच्या दिशेने भरधाव जात असल्याचे सोमवारी (ता. 16) रात्री दोनच्या सुमारास पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. पोलिस वाहनचालक घरटे यांनी नांदुरी येथील पोलिस कर्मचारी शिवाजी शिंदे यांना सतर्क करत संशयित वाहनाची माहिती दिली.

कळवण पोलिसांची कारवाई..असा घडला प्रकार

पोलिस मागे येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी आठंबे शिवारात गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. मंगळवारी (ता. 17) सकाळी संशयित पाळे पिंपरी शिवारातील डोंगर उतरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी विश्‍वनाथ झिरवाळ यांना ग्रामस्थांनी दिली. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने सईद हसमोहंमद सय्यद (वय 28, रा. अनाहत सोसायटी, पखाल रोड, नाशिक), जावेद मोहमद शेख (40, रा. सय्यद बुरद्दीनबाबा चौक, दिंडोरी), विनोद गुंजाळ (23, रा. म्हसोबानगर, पेठ रोड, नाशिक), आकाश आहेर (20, रा. महादेववाडी, सातपूर, नाशिक) या चौघा संशयितांना मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी पकडले. त्यांच्याजवळ साडेआठ इंच लांब पाते, मोठा कोयता, चाकू, अडीच फुटाची टॉमी, कुकरी, कटावनी व इतर हत्यारे सापडली.

पोलिसांनी संशयितांना अटक करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार अशोक ब्राह्मणे, विश्‍वनाथ झिरवाळ, कैलास घरटे, नानू पाडवी, शिवाजी शिंदे यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What happened in the Sinnar FDA raid?
Samir Bhujbal latest Yeola political news
NCP’s New Organisational Strategy: Dilip Khaire Introduces ‘Tuesday Pattern’ in Baglan
Maharashtra Heavy Rain Alert:
Marathi News Esakal
www.esakal.com