जागतिक मराठी भाषा दिन : परदेशातील बालकांच्या मराठी बोलीने सर्वच अचंबित!

marathi bhasha din story.png
marathi bhasha din story.png

इंदिरानगर (नाशिक) : नाशिक येथील मानवधन शैक्षणिक संस्थेने अवघ्या दीड महिन्यापूर्वी सुरू केलेल्या मराठी भाषा वैश्विक शाळेत प्रवेश घेतलेल्या परदेशातील नऊ बालकांनी जागतिक मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या तोडक्या-मोडक्या मराठीत सादरीकरण करून सर्वांनाच अचंबित केले.

परदेशातील बालकांच्या मराठी बोलीने सर्वच अचंबित 

काहींनी बडबडगीते म्हटली, काहींनी कुटुंबाची माहिती मराठीतून दिली. तर काहींनी मराठी कविता आणि मराठी महिने कोणते आहे, याचे सादरीकरण केले. त्यांचा हा प्रयत्न पाहून त्यांचे आई-बाबा आणि ही शाळा सुरू करणाऱ्या मानवधन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही मोठा आनंद झाला. ११ जानेवारीला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या आगळ्यावेगळ्या शाळेचे ऑनलाइन उद्‌घाटन केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर उपस्थित होते. या शाळेची कल्पना ऐकून प्रमुख पाहुणेही अचंबित झाले होते.

मराठी भाषा वैश्विक शाळेत गिरविले धडे 

सध्या या शाळेत अमेरिकेतील स्वरा मधाने, आर्या गोसावी, अहंती बोधे, टीशा पाटील, आर्यन लोखंडे आणि साहावी शिंदे, नेदरलॅंड येथील शौर्य भंडारी, ब्रिटनमधील पार्थ पगारे आणि ऑस्ट्रेलियामधील जैविक खरोटे या बालकांनी प्रवेश घेतला आहे. या शाळेची निर्मिती सहा ते बारा वयोगटातील बालकांसाठी आहे. त्यासाठी संस्थेने १९ जणांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. तेथील वेळेनुसार प्रा. कीर्ती वर्मा आठवड्यातून ऑनलाइन वर्ग घेतात. या बालकांना मराठी भाषा, तिची व्याप्ती, महाराष्ट्रातील संत परंपरा, इतर सांस्कृतिक परंपरांची आणि अक्षरओळख व्हावी. राज्यात असणाऱ्या नातलगांशी तसेच त्यांच्या देशात असणाऱ्या इतर महाराष्ट्रीयन माणसांशी संवाद साधता यावा या मुख्य उद्देशाने ही शाळा सुरू करण्यात आली आहे. 


 

मराठीची अक्षरओळख झाल्याने आता मराठीतून थोडे बोलू शकते. मराठीचा अभ्यास करायला आवडते. मी आणि आई-बाबादेखील यामुळे आनंदी आहोत. - आर्या गोसावी, विद्यार्थिनी 


मुलाचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. त्यामुळे सबकुछ इंग्रजी होते. आता मात्र तो तोडक्या-मोडक्या मराठीत संवाद साधू शकतो. मराठीबाबत आणि महाराष्ट्राबाबत खूप विचारतो याचा खूप आनंद झाला आहे. - ललिता खराटे, पालक 


मराठी भाषा, महाराष्ट्र आणि आपली परंपरा याचा मेळ घालण्यासाठी सुरू केलेल्या या शाळेला मिळणारा पालकांचा प्रतिसाद अचंबित करणारा आहे. या माध्यमातून मराठी साहित्य आणि महाराष्ट्राची लोकधारा वैश्विक पातळीवर नेण्याचा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात नक्की यश मिळेल, असा विश्वास आहे - प्रकाश कोल्हे, संस्थापक, मानवधन संस्था 
 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com